कोकण

जिल्ह्यातील १२ नेमबाज राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना

CD

10401

जिल्ह्यातील १२ नेमबाज
राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः ६८ वी राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा ११ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान भोपाळ व दिल्ली येथे आयोजित केली आहे. भोपाळ येथे रायफल प्रकारातील, तर दिल्ली येथे पिस्तूल प्रकारातील स्पर्धा घेण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १२ नेमबाज रवाना झाले.
१० मीटर रायफल प्रकारात शिवम चव्हाण (सावंतवाडी), गौरव आजगावकर (वेंगुर्ले), नीलराज सावंत (सावंतवाडी), हंसिका गावडे (मोरे) हे चार नेमबाज एम.पी. स्टेट शूटिंग अकादमी भोपाळ येथील स्पर्धेत सहभागी होतील, तर अन्विता सावंत (कणकवली), राजकुमारी बगळे (कुडाळ), अवनी भांगले (सावंतवाडी), श्रीया नाखरे (सावंतवाडी), समर्थ बगळे (कुडाळ), अमेय जाधव (सावंतवाडी), शैलेश सावंत (सावंतवाडी) यांची १० मीटर पिस्तूल प्रकारासाठी निवड झाली आहे. प्रतीक्षा सावंत (सावंतवाडी) ही २५ मीटर स्पोर्ट पिस्तूल प्रकारात सहभागी होणार आहे. ही स्पर्धा डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज, तुघलकाबाद, नवी दिल्ली येथे आयोजित केली आहे. हे सर्व नेमबाज उपरकर शूटिंग अकादमी, सावंतवाडी व वेंगुर्ले येथे नेमबाजीचा सराव करत असून त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन आहे.
....................
10402

नेमळे पंचक्रोशी प्रशालेचे
विविध स्पर्धांमध्ये यश
सावंतवाडी, ता. १३ ः पाटकर वर्दे कॉलेजतर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.
पाककला स्पर्धेत अनिशा मयेकर हिने प्रथम, सलील कुडाळकर याने तृतीय व सानिका राऊळ हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. रील मेकिंग स्पर्धेत सार्थक राऊळ याने तृतीय, रांगोळी स्पर्धेत भार्गवी मांजरेकर हिने उत्तेजनार्थ, रील स्पर्धेत साहिल कुडाळकर याने तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष आ. भि. राऊळ, पदाधिकारी, प्राचार्य आर. के. राठोड, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना सुषमा कासार यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT