कोकण

फळांची ओळख, सदृढ जीवन

CD

10586

फळांची ओळख, सदृढ जीवन

संस्कार स्कूलचा उपक्रम ः ‘फळांचे मिश्रण’ उपक्रमाला प्रतिसाद


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात नुकताच ‘फळांचे मिश्रण’ हा मनोरंजक व आरोग्यदायी उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमामुळे लहान विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व आणि विविध फळांचे आरोग्यदायी फायदे प्रत्यक्ष कृतीतून दाखविण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाऐवजी व्यावहारिक अनुभवातून फळांचे रंग, पोत आणि चव यांची ओळख करून देणे हा होता. प्रत्येक फळाचे पौष्टिक मूल्य आणि आरोग्यासाठी असलेले फायदे समजावून सांगण्यावर विशेष भर दिला.
विद्यार्थ्यांनी आपल्या घराकडून सफरचंद, केळी, द्राक्षे, पपई आणि अननस यांसारखी विविध प्रकारची ताजी आणि स्वच्छ फळे आणली होती. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी स्वतः फळांचे छोटे-छोटे तुकडे केले. त्यानंतर सर्व फळे एका मोठ्या भांड्यात एकत्र करून, मध किंवा चाट मसाला यांसारखे नैसर्गिक घटक मिसळून स्वतःच्या आवडीनुसार चवदार मिश्रण तयार केले. या उपक्रमादरम्यान शिक्षकांनी मुलांना सफरचंदात असलेले ‘लोह’, संत्र्यात लपलेले ‘क’ जीवनसत्व अशा प्रकारे प्रत्येक फळाच्या महत्त्वाच्या पोषणतत्त्वांबद्दल माहिती दिली.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र बसून स्वतः तयार केलेल्या ‘फ्रूट सॅलड’चा आस्वाद घेतला. हा अनुभव सर्वांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, व्यावहारिक आणि जीवनोपयोगी शिक्षण देणे गरजेचे आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये सामूहिक श्रमवृत्ती आणि आरोग्याबद्दल जागरूकता झाली, असे त्यांनी सांगितले. हा उपक्रम शाळेच्या वर्षभरातील ‘आरोग्य आणि पोषण’ संबंधित उपक्रमाअंतर्गत घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT