कोकण

सरोळीतील महिलांना घरघंट्यांचे मोफत वाटप

CD

- rat१४p१८.jpg-
२५O१०६३८
कोल्हापूर ः सरोळी येथे महिलांना स्वयंरोजगारासाठी १६ घरघंट्यांचे वाटप करण्यात आले.

सरोळीतील महिलांना घरघंट्यांचे मोफत वाटप
सरोळीमध्ये जगद्‍गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या पादुका दर्शन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी ता. १५ ः जगद्‍गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा कोल्हापूरमधील सरोळी (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथे झाला. यावेळी दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी १६ घरघंट्यांचे वाटप करण्यात आले.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या दिव्य पादुकांची सरोळी येथील आकाराम देसाई यांच्या निवासस्थानापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष उमेश आपटे, लोकमान्य संस्था समूहाचे संस्थापक जनार्दन नेऊगरे उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना विभागीय पोलीस अधीक्षक रामदास इंगवले यांनी जगद्‍गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांचे समाजकार्य व आध्यात्मिक कार्य खूप मोठे आहे, असे सांगितले. तसेच घरघंटी वाटप केल्याने महिलांना फायदा होईल, असा विश्वासही व्यक्त केला. रामानंदाचार्य पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना युवकांनी स्वतःचा रोजगार व नोकरी सांभाळून आजच्या धावत्या युगामध्ये आध्यात्मिक मार्गाने चालावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी सुमारे दहा हजार भाविक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा माळी, सहअध्यक्ष मधुकर बाबर, जिल्हा सचिव दिलीप कोळी, जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली पाटील, जिल्हा युवाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा कर्नल रूपेश सुतार यांच्यासह सर्व जिल्हा सेवा समितीमधील माजी व विद्यमान पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT