कोकण

ई-पीक पाहणी नोंदणीसाठी तालुकास्तरीय समिती गठित

CD

ई-पीक पाहणी नोंदणीसाठी
तालुकास्तरीय समिती गठित
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ः विहित मुदतीत ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेण्यासाठी समिती गठित केली आहे. राज्यात खरीप हंगाम १ ऑगस्टपासून सुरू झाला होता. त्यांतर्गत १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच १ ऑक्टोबरपासून सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी केली होती.
राज्यात बऱ्याच जिल्ह्यात उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज या लाभांपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, याकरिता सहायक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. हिवाळी अधिवेशनात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विहित मुदतीत ई-पीक पाहणी नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये सदस्य म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीच्या फेरचौकशीमध्ये होणाऱ्या पीक नोंदीच्या अनुषंगाने शेतातील शेतमाल खरेदी केंद्रावर खरेदी करण्याच्या अनुषंगाने पणन विभागाने आवश्यक त्या पुढील सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करावी, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवजयंतीसाठी रितेश देशमुख शिवनेरीवर, बालशिवरायांना पाहताच झाला नतमस्तक, VIRAL VIDEO

Gold Rate Today: सर्वसामान्यांची चिंता वाढली! सोनं-चांदीच्या भावात मोठी वाढ; पाहा आजचा ताजा भाव

Viral Video : नवरा-नवरीने स्टेजवरुन उतरून केलं असं काम... होतेय सगळीकडे कौतुक, हृदस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Youth killed in Ichalkaranji : मित्राने वडिलांना फोनवरून शिवीगाळ केली, राग मनात धरून तीन मित्रांनी आपल्याच मित्राचा केला खून, इचलकरंजी येथील घटना

Gadchiroli News: माओवाद्यांची ४४ स्मारके जमीनदोस्त; एकाच दिवसात ८०० जवानांच्या १८ पथकांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT