कोकण

थंडी वाढली, हापूस कलमे मोहोराने बहरली

CD

-rat१५p२०.jpg-
२५O१०७९६
राजापूर ः आंबाकलमांवर डोकावत असलेला मोहोर.
----
थंडी वाढली, हापूस कलमे मोहोराने बहरली
बागायतदार सुखावला ; ‘तुडतुडा, थ्रीप्स’ रोखण्यासाठी औषध फवारणी सुरू
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः लांबणीवर पडलेल्या पावसामुळे आंबा कलमांना आलेली पालवी जून (अधिक मजबूत) होत आहे. याच कालावधीत थंडी वाढत असून, काही भागांमध्ये हापूस कलमांना मोहोर येऊ लागला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये वातावरण कसे राहील, याकडेही बागायदार लक्ष ठेवून आहेत. सध्या तुडतुडा आणि थ्रीप्सचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बागांमध्ये सध्या कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यावर जोर आहे. सध्याच्या वातावरणामुळे मोहोर येण्यास पूरक वातावरण आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असलेला आंबा हंगाम गतवर्षी सुरुवातीपासून प्रतिकूल हवामान आणि निसर्गसंकटाच्या दुष्टचक्रामध्ये सापडलेला होता. लांबणीवर पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी आवश्यक थंडी गतवर्षी उशिरा सुरू झाली होती. त्यामुळे आंबा हंगामालाही विलंब झाला होता. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी पालवीला अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यातच, थ्रीप्स आणि किडीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे मोहोरापूर्वी आलेली पालवी धोक्यात आली होती. बहुतांश कलमांना उशिरा मोहोर आल्याने त्याचा फटका आर्थिक उलाढालींना बसला होता.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाऊस हंगाम लांबणीवर पडलेला होता. त्यातून, आंबा कलमांना चांगलीच पालवी फुटली होती. मागील महिन्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसाचा म्हणावा तितकासा पालवीवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. भविष्यात मोहोर येण्यास अनुकूल ठरणारी पालवी दिवसागणिक जून होत आहे. गेल्या आठवडाभरापासून थंडीचाही ज्वर हळूहळू वाढू लागला असून, भविष्यामध्ये मोहोर येण्यास ही थंडी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सुखावला आहे.

चौकट
मुबलक आंबा एप्रिलमध्ये
बदलत्या वातावरणाचा फटका बसून अनेकवेळा आंबा कलमांना उशिरा मोहोर येतो. तो तयार होऊन बाजारपेठेत विक्रीसाठी जाण्याला साधारण एप्रिलचा शेवटचा आठवडा किंवा मे महिना उजाडतो; मात्र, तोपर्यंत आंब्याला बाजारपेठेत मिळणार दर घसरलेला असतो. अशावेळी बागायदार आंबा कॅनिंगला देतात. दरवर्षीच्या या आंबा कॅनिंगच्या स्थितीमध्ये उशिरा मोहोर आल्यास यावर्षी वाढ होणार का? याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Supply: गॅस कमी लागणारे पदार्थच उपलब्ध करा, इंडक्शन वापरण्याचा हॉटेल संघटनेचा सल्ला

Nagpur Crime : कुख्यात बुकी ‘बोमा’कडून गुंड सुमीत ठाकूरच्या वाढदिवसाचे बॅनर; प्रमुख चौकात झळकले फलक, पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

Air pollution Suicide : वाढता उन्हाळा अन् प्रदूषण स्वतःचा जीव घेण्यासाठी करतय प्रवृत्त? धोका ५०% ने वाढला, धक्कादायक रिसर्च पाहा

Weather Update : नाशिककरानो सावधान! रणरणत्या उन्हात आता पावसाचे सावट; 'या' तारखेपासून मेघगर्जनेचा इशारा

SCROLL FOR NEXT