कोकण

-ग्रामीण भागातील नागरिक खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवू शकतात

CD

व्यावसायिक शेतीकडे वळा
विनोद हेगडे ः देवरूखात कुणबी महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १६ ः ग्रामीण भागातील नागरिकच खऱ्या अर्थाने समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात. शेतकऱ्यांनी आता व्यावसायिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. यासाठी लागणारी सर्व मदत आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभाग सदैव तत्पर राहील, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुहास खंडागळे व उदय गोताड यांच्या संकल्पनेतून आयोजित पहिल्या ‘कुणबी महोत्सवात’ ते बोलत होते. या वेळी गावकर राजेश गोताड, बुधाजी खंडागळे, ढवळ गुरूजी, युयुत्सू आर्ते, कृषितज्‍ज्ञ राहुल यादव, डॉ. मंगेश कांगणे आदी उपस्थित होते. या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ उत्सव साजरा न करता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ‘व्यावसायिक शेती’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हेगडे यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली. सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते वसंत मेस्त्री, जगन्नाथ दुदम, निखिल सकपाळ, तुषार गमरे, संदीप सावंत, रमेश मेस्त्री, प्रदीप चंदरकर, संगमरत्न फाउंडेशन, सूरज धावडे यांना मानाचा ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

Viral Video : वडिलांनी घरात सगळ्यांसमोर वाचलं मुलाच्या गर्लफ्रेंडचं लव्ह लेटर,पुढं असं घडलं असं काही... व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

Video : 'या' अत्यंत पवित्र ठिकाणी विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ ! चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

Gold Rate Today : आज सकाळीच सोनं आणखी स्वस्त! जागतिक घडामोडींचा परिणाम; ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT