कोकण

भारती राजवाडे यांना राज्यस्तरीय आई काव्य पुरस्कार

CD

- rat१६p३.jpg-
२५O११००१
रत्नागिरी ः पुणे येथील सीता ट्रस्ट अहिल्यानगर व समर्थ फाउंडेशन व जिजाई बहुउद्देशीय सेवा संस्था कल्याण महाराष्ट्रतर्फे भारती राजवाडे आई काव्य पुरस्काराने सन्मानित.

भारती राजवाडेंना आई काव्य पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः सीता ट्रस्ट अहिल्यानगर व समर्थ फाउंडेशन पुणे जिजाई बहुउद्देशीय सेवा संस्था कल्याण महाराष्ट्र यांच्यातर्फे राज्यस्तरीय ‘आई’ हा काव्य महोत्सव साहित्यिक पुरस्कार देवरूख येथील लेखिका भारती राजवाडे यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेले निःस्वार्थपणे काम करणारे समाजसेवक, गुरू संदीप पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
रविवारी (ता. १४) वि. का. राजावाडे सभागृह भारत इतिहास संशोधन मंडळ सदाशिव पेठ पुणे येथे या पुरस्काराचे वितरण झाले. प्रसिद्ध कवी-कवयित्रींच्या आई या राज्यस्तरीय ११२१ ग्रंथ पुस्तक कवितासंग्रह असलेल्या साहित्यक्षेत्रातील पुरस्कार देवरूखच्या लेखिका, पत्रकार राजवाडे यांना मिळाला. आई या पुस्तकात ५००हून अधिक पानांचा भव्यदिव्य ग्रंथपुस्तक काव्यसंग्रहात राजवाडे यांच्या दहा साहित्य कविता प्रकाशित झाल्या आहेत. या कार्यक्रमाला पद्मश्री राहीबाई पोपरे (बीजमाता) पद्मश्री दादा इदाते, पद्मश्री पोपटराव पवार, आचार्य सीए डॉ. शंकर अंदानी, किरण इनामदार, समर्थ फाउंडेशनचे संदीप पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Sindhudurg Development : डांबरीकरणाकडून काँक्रिटीकरणाकडे; नवे रस्ते पर्व, ऊन, वारा, पावसात कितपत तग धरणार?

Latest Marathi News Update : १८ तारखेला रोहित पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद, विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशनचा दुसरा अंक

Pune News : वर्षात १५ दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिवर्धक वापरास परवानगी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आदेश

Crime News : नाशिकमध्ये चोरांचे राज्य? भरदिवसा घरफोड्या करून १४ लाखांचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत!

SCROLL FOR NEXT