कोकण

बिर्जेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी

CD

11057

बिर्जेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी
कुडाळ, ता. १६ ः जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे जिव्हाळा सेवाश्रमच्या संचालिका गीतांजली बिर्जे यांनी आपला वाढदिवस सोहळा सेवाश्रमात साजरा केला. यावेळी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. पदाधिकारी, मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष सुरेश बिर्जे, उपाध्यक्ष राजू बिर्जे, खजिनदार साक्षी बिर्जे, सचिव संदीप बिर्जे, सहसचिव सुंदर मेस्त्री, दत्तात्रय पाटकर, संजय बिर्जे, दीपाली पाटकर, संतोष सांगळे, सल्लागार समितीचे सदस्य नाना राऊळ, बाबीदास गावडे, जयप्रकाश प्रभू उपस्थित होते. या सर्वांनी जिव्हाळा सेवाश्रममार्फत वृद्ध, निराधार व गरजवंतांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी गीतांजली यांना शुभेच्छा दिल्या.
-------------
11056

ओटववाडी येथे हरिनाम सप्ताह
नांदगाव, ता. १६ ः ओटववाडी येथील हरिनाम सप्ताह उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. यानिमित्त रात्री भजनसम्राट बुवा भगवान लोकरे व भजनसम्राट बुवा प्रमोद हर्याण यांची संगीत डबलबारी रंगली. ओटववाडी येथील पिंपळपार चव्हाटा येथे प्रतिवर्षीप्रमाणे हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. यासाठी संपूर्ण ओटव गावातून माहेरवाशिणी व मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तिगीते व पारंपरिक हरिभजनाने ओटववाडी भक्तिसागरात न्हाऊन निघाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

Latest Marathi News Update : टिपू सुलतानाचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पद देतील - सपकाळ

अपूर्वा नेमळेकरने स्वत:च्या लग्नात शरारत गाण्यावर केला धमाकेदार डान्स, VIRAL VIDEO

"माझा पार्टनर फक्त.." धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणालचा खुलासा; म्हणाली..

Karad Crime: शाळकरी विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग; व्हॅलेंटाइन डेदिवशी धक्कादायक घटना उघडकीस, कऱ्हाडमध्ये उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT