कोकण

सुभाष गोवेकर यांचा मुंबई येथे सत्कार

CD

11058
सुभाष गोवेकर यांचा
मुंबई येथे सत्कार
सावंतवाडी, ता. १६ ः स्वतंत्र कोकणराज्य अभियान या संघटनेतर्फे येथील निवृत्त प्राध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष गोवेकर यांना ‘कोकणरत्न पदवी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सोहळा नुकताच मुंबई येथील मराठी पत्रकार भवनात झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संजय कोकरे होते. धनंजय कुवेसकर, राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे, दिलीप लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कोकणातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना यावेळी गौरविण्यात आले. निवृत्त प्राध्यापक असलेल्या श्री. गोवेकर यांनी विविध संस्थांवर दीर्घकाळ काम केले. यात ग्राहक संरक्षण चळवळ, पर्यावरण, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सक्रिय संघटना, आरोग्य, इंडिया रेडक्रॉस सोसायटी, अहिल्या ट्रस्ट आदींमध्ये त्यांनी केलेले काम उल्लेखनीय ठरले. त्यांच्या या सगळ्या कार्याचा विचार करून हा पुरस्कार देण्यात आला. स्वतंत्र कोकण संस्थेचे संजय कोकरे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात पदक तसेच मानपत्राचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update :धावत्या ट्रेनमधून वैतरणा नदीत पडला तरुण, सतर्कतेमुळे जीव वाचला

SCROLL FOR NEXT