कोकण

संत जगनाडे महाराजांना सावंतवाडीत आज वंदन

CD

11118

संत जगनाडे महाराजांना
सावंतवाडीत आज वंदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः प. पू. संताजी जगनाडे महाराज यांची ३२६ वी पुण्यतिथी उद्या (ता. १७) तेली समाज उत्कर्ष मंडळ यांच्या माध्यमातून चंद्रभागा निवास, संताजीनगर, सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. यावेळी ७५ वर्षांवरील नागरिक ज्ञाती बंधू-भगिनींचा सत्कार करण्यात येणार आहे.
यावर्षीचे पूजेचे मानकरी जयराम आजगावकर दांपत्य आहे. सकाळी ९ ते ११.३० वाजता परमपूज्य सद्गुरू संताजी जगनाडे महाराज मूर्ती पूजन, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते २.३० वाजता महाप्रसाद, दुपारी २.३० ते ४.३० वाजता प्रमुख पाहुण्यांतर्फे ज्येष्ठ ज्ञाती बंधू व भगिनींचा सत्कार प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष तुकाराम तेली यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते माजी जिल्हाध्यक्ष उद्योगपती एकनाथ तेली उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सावंतवाडी तेली समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्याम निवेलकर, सचिव महादेव आजगावकर, कार्याध्यक्ष कृष्णा तेली, उपाध्यक्ष दिनकर तेली यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
.................
11119

परुळे श्री वराठी देवीचा
आज वार्षिक जत्रोत्सव
म्हापण, ता. १६ ः परुळे बाजार येथील श्री देवी वराठीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. १७) साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी पूजा, दिवसभर ओटी भरणे कार्यक्रम, रात्री प्रदक्षिणा, त्यानंतर कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (कै. बाबी कलिंगण) नेरूर यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT