कोकण

वाळूसह दगड चोरीस, प्रशासन निद्रीस्त

CD

11125

वाळूसह दगड चोरीस, प्रशासन निद्रीस्त!

ग्रामस्थांचा ठिय्या; सांगेली काजरमळा ते माडखोल नदीपात्रात चोरी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः कोणतीही प्रशासकीय परवानगी नसताना सांगेली काजरमळा ते माडखोल अशा चार किलोमीटर नदीपात्रातील वाळू, दगड-गोटे मोठ्या प्रमाणात चोरीला गेले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार देऊनही संबंधित महसूल प्रशासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच वाळूची होणारी चोरी थांबवावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
तेरेखोल नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी २०२२ ते २०२३ दरम्यान परवानगी दिली होती. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांचा समावेश होता. त्यात सावंतवाडीतील माडखोल धरण ते सापळेस्टॉप व सापळे स्टॉप ते फुगीबाजार तसेच माडखोल ते धवडकी स्मशानभूमी असा गाळ काढण्याचा आदेश महसूल कार्यालयाकडून दिला होता. याचा फायदा घेत वाळू माफीयांनी सांगेली काजरमळा ते माडखोल या भागातील वाळुची चोरी सुरू केली आहे. याबाबत तालुका महसूल प्रशासन सावंतवाडी तसेच मंडल अधिकारी आंबोली, तलाठी कार्यालय यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. या अधिकाऱ्यांचे व वाळू माफीयांचे साठे-लोटे असल्याचे यातून दिसून येते. सांगेली काजरमळा ते माडखोल या चार किलोमीटर नदीपात्रातील हजारो ब्रास वाळू, गोटे चोरीला गेलेले आहेत. याकडे संबंधित महसूल अधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे शासनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सांगेली तेरेखोल नदीपात्राच्या जंगलमय परिसरात लाखो टन दगड, वाळू गोटे जमा करून ठेवल्याचे स्थानिक सांगेली ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.
----
अधिकाऱ्यावर कारवाई करा!
सद्यस्थितीमध्ये जोरदार वाहतूक सुरू आहे तरी याबाबत सखोल चौकशी करून सद्यस्थितीत चालू असलेली चोरटी वाहतूक थांबवावी. तसेच कोणतीही प्रशासकीय परवानगी नसताना हजारो ब्रास वाळू दगड, गोट्यांच्या होणाऱ्या चोरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक महसूल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज सामाजिक कार्यकर्ते राऊळ यांच्यासह सुबोध राऊळ, कृष्णा राऊळ, श्रीकांत खोत, विजय राऊळ आदी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयसमोर उपोषणास बसले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर सुमारे २५ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT