कोकण

चिपळूण - दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आधार E-KYC व UDID कार्ड सक्तीचे

CD

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी
ई-केवायसी, युडीआयडी अत्यावश्यक
चिपळूण, ता. १७ : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिव्यांग प्रमाणपत्राला आधारकार्डशी ई-केवायसी करणे व युडीआयडी कार्ड काढणे बंधनकारक आहे. याबाबत तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी सर्व ग्राममहसूल अधिकारी व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.
राज्यशासनाच्या १८ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासननिर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वाडीनिहाय व सोयीनुसार विशेष ई-केवायसी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तहसिलदारांच्या सूचनेनुसार, ग्राममहसूल अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आधारकार्डशी ई-केवायसी करून घेण्यासाठी महा ई-सेवाकेंद्र चालकांशी समन्वय साधावा. यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांचीही मदत घ्यावी व ठरवण्यात आलेल्या दिवशी कॅम्पचे आयोजन करावे. या प्रक्रियेनंतर करण्यात आलेल्या ई-केवायसीबाबतचा सविस्तर अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, चिपळूण तालुक्यातील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे युडीआयडी कार्ड अद्याप काढलेले नाहीत किंवा ज्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र जुने आहे अशा लाभार्थ्यांसाठी २३ रोजी कामथे उपजिल्हा रुग्णालयात विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सकाळी ठीक १० वा. उपस्थित राहून दिव्यांग प्रमाणपत्राचे नूतनीकरण तसेच युडीआयडी कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT