सकाळ विशेष - लोगो
rat17p24.jpg
11325
दापोलीः हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यातील भिंतीवर वृक्षवेलींनी आक्रमण केले असून, त्यामुळे भिंतीही दिसेनाशा झाल्या आहेत.
rat17p25.jpg-
11326
किल्ल्याच्या भिंतीवर खोलवर गेलेली झाडांची मुळे.
rat17p26.jpg-
O11327
किल्ल्यावरील गोड्या पाण्याची तळी पूर्ण भरलेली असली तरीही त्यात शेवाळ पसरलेले आहे.
rat17p28.jpg-
11329
किल्ल्यावरील तळ्यांचे तीन भागात विभाजन केलेले असून, हे तिन्ही भाग काळ्या दगडात बांधलेले आहेत.
- rat17p29.jpg-
11330
किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीवरही झाडांनी आक्रमण केले असून, त्याची स्वच्छता गरजेची झाली आहे.
- rat17p30.jpg-
11331
किल्ल्यावरील तोफ
rat17p30.jpg-
11332
किल्ल्यावरील चोरदरवाजा. हा दरवाजा समुद्रात बाहेर पडतो.
सुवर्णदुर्गचे सौंदर्य झाडाझुडपात हरवतेय
जागतिक वारसास्थळात नोंद; स्वच्छता, डागडुजीकडे दुर्लक्ष
राधेश लिंगायतः सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १७ः कोकणातील महत्वाच्या जलदुर्गांपैकी हर्णै येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याची निवड जागतिक वारसास्थळांमध्ये झालेली आहे. ही बाब अभिमानास्पद असली तरीही, प्रत्यक्षात मात्र त्या जलदुर्गाची दुरवस्था झालेली आहे. तटबंदीवर झाडेझुडपे वाढली असून, पर्यटकांसाठी तिथे सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर नोंदला गेलेला हा ऐतिहासिक वारसा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.
सुवर्णदुर्ग किल्ल्याचे वेगळेपण निश्चितच पर्यटनाला चालना देणारे असेच आहे; मात्र हा किल्ला आजही संवर्धनाच्यादृष्टीने दुर्लक्षितच आहे. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राच्या लाटांच्या माऱ्यात किल्ल्याच्या बाहेरील बुरूजांचे नुकसान झालेले आहे. तसेच दोन्ही बाजूने भिंतींवर प्रचंड प्रमाणात मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली आहेत. वनस्पतींच्या मुळांमुळे तटबंदीच्या दगडांमध्ये भेगा पडण्याची शक्यता असून, भविष्यात ही मजबूत तटबंदी ढासळण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आतील भागातील भिंती झाडीमुळे पूर्णपणे दिसेनाशा झालेल्या आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या पर्यटनाचा साज हरवत आहे.
किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी शासनाने एका व्यक्तीची नियुक्ती केली असून, त्याला मानधनही दिले जाते; मात्र आतील भागाची स्वच्छता समाधानकारक नसल्याची तक्रार स्थानिक आणि गडप्रेमींकडून केली जात आहे. पावसाळा संपल्यानंतर या किल्ल्यावरील पर्यटन मोठ्या प्रमाणात सुरू होते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे दाखल होतात. सध्या ख्रिसमस सुट्टीतही पर्यटकांच्या रांगा लागतील. या द्वारे स्थानिकांनाही रोजगार मिळत आहे; परंतु या किल्ल्यावर आवश्यक सुविधाच दिल्या गेल्या नसल्याचे दिसून येते. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. सुवर्णदुर्ग किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणात असला तरी राज्यशासनानेही तितकेच लक्ष देऊन पर्यटनाला प्रोत्साहन दिले पाहिजे जेणेकरून ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच स्थानिकांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याबरोबरच देशाचं नावदेखील उंचावेल.
सुवर्णदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे इ. स. १६६० च्या आसपास बांधल्याची नोंद आहे. मराठा नौदलाच्या विस्तारात आणि सुरक्षाव्यवस्थेत या किल्ल्याचे महत्व अधिक होते. किल्ल्याचे नियंत्रण शिवाजी महाराजांनंतर कान्होजी आंग्रे यांच्याकडे होते. हा किल्ला आंग्रे यांच्या समुद्री संरक्षण किल्ल्यांचे मुख्य केंद्र होता. हा किल्ला समुद्रात जवळच्या बेटावर उभारलेला आहे. याच किल्ल्यावरून आंग्रे यांनी अनेक परकीय जहाजांना आव्हान दिले होते तसेच आग्नेय सागरावर मराठ्यांची पकड मजबूत करण्यासाठी या किल्ल्याचे महत्व अधिक आहे. किल्ल्याच्या भिंती भक्कम दगडांच्या असून, आजही मजबुती जाणवते. किल्ल्यातून समुद्रावर टेहळणी करण्यासाठी उत्तम स्थान आहे. किल्ल्यावर बुरूज आणि गंजत अस्तव्यस्त तोफा दिसून येतात. किल्ल्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेता आजही देशाच्या सीमांवर नजर रोखून आहेत.
चौकट
पर्यटनाच्यादृष्टीने आवश्यक सुधारणा
भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित हा किल्ला असला तरी राज्यशासनाने पर्यटनाला चालना देण्यासाठी खालील पावले उचलणे गरजेचे आहे.
वाहतूक व्यवस्था ः हर्णै ते सुवर्णदुर्ग प्रवासासाठी बोटींचे निश्चित वेळापत्रक आणि ऑनलाइन बुकिंग सुविधा.
सुरक्षा ः प्रत्येक पर्यटकासाठी लाइफजॅकेटची सक्ती आणि बोटींची सुरक्षितता हवी
नागरी सुविधा ः किल्ल्याच्या परिसरात आधुनिक स्वच्छतागृहे आणि विश्रामगृहांची उभारणी करावी
माहितीफलक ः किल्ल्याचा इतिहास सांगणारे मराठी आणि इंग्रजी भाषेतील स्पष्ट फलक हवेत
चौकट
ती ७ तळी दुर्लक्षित
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर काळ्या पाषाणात खोदलेली एकूण सात गोड्या पाण्याची तळी आहेत. ती तळी आजही सुस्थितीत असली तरीही त्यांच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्या या टाक्यांवर शेवाळाचे साम्राज्य पसरलेले होते. त्यांचे जतन केले तर त्यातील पाणी नियमित वापरासाठी उपयुक्त ठरू शकते.
-----
चौकट
बोटींचा प्रतिक्षा कालावधी वाढविण्याची गरज
किल्ल्याचा परिसर मोठा असल्याने अर्ध्या तासात संपूर्ण किल्ला पाहून घेणे शक्य होत नाही. पर्यटकांना घेऊन येणाऱ्या बोटी अर्ध्या तासात माघारी परतात. त्यामुळे पर्यटकांना किल्ला व्यवस्थित पाहता येत नाही. त्यासाठी किल्ल्याच्या आतील भागात असलेल्या मुख्य ठिकाणांच्या जागी माहितीफलक उभारले तर पर्यटकांना ठिकाणे पाहता येतील. बोटींचा प्रतीक्षा कालावधी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मुरूड-जंजिरा किल्ल्याच्या ठिकाणी पाऊण तास वेळ फिरण्यासाठी दिला जातो. इथे मात्र तसं होत नाही. ही गोष्ट गांभीर्याने पाहावी, अशी सूचना पर्यटकांकडून होत आहे.
rat17p22.jpg
11323
अॅड. श्रीपाद भोसले
कोट
किल्ल्याची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक माहिती देण्याकरिता प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार मिळवून देता येईल. किल्ल्याची माहिती देणारे मराठी आणि इंग्रजी भाषेतील फलक जागोजागी लावले पाहिजेत. किल्ल्याच्या भोवतालचा समुद्र परिसर स्वच्छ आहे. नितळ पाणी असल्यामुळे समुद्र जीवसृष्टी पर्यटकांसाठी पर्वणी आहे; मात्र तेथील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी पर्यटकांना प्रबोधन करावे लागणार आहे. छत्रपती शिवरायांचे आणि धारातीर्थ झालेल्या अनेक मावळ्यांचे स्मरण करण्याची ही एक संधी आहे. त्या दृष्टीने या जलदुर्गांचे संवर्धन केले पाहिजे.
- अॅड. श्रीपाद भोसले, डोंबिवली (ठाणे)
rat17p23.jpg-
11324
भरत जोशी
सुवर्णदुर्ग हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी दूरदृष्टीचे जिवंत प्रतीक आहे. आजही किल्ल्याकडे पाहिल्यास मराठ्यांच्या नौदल सामर्थ्याची जाणीव होते. एवढ्या महत्त्वाच्या किल्ल्यावर पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा अभाव आहे. सुरक्षित होड्या, लाईफजॅकेट, ठराविक वेळापत्रक, स्वच्छतागृहे व विश्रामगृहांची व्यवस्था झाल्यास पर्यटन वाढून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पर्यावरण जपून पर्यटन विकास शक्य असून, शासन व पुरातत्त्व विभागाने संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत.
- भरत जोशी, लेखक, ब्रेलपुस्तक
-----
कोट ३
दापोली तालुक्यातील एकमेव जलदुर्ग म्हणून नावारूपास आलेल्या सुवर्णदुर्गची जागतिक वारसास्थळांच्या यादीत नोंद होऊन ६ महिने झाले तरीही या किल्ल्याच्या आतील साफसफाईकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. आता पर्यटन हंगामही सुरू झाला आहे. या भागामध्ये येणारा प्रत्येक पर्यटक येथील किल्ल्याला आवर्जून भेट देतो. याचाच विचार करून पुढील कार्यवाही लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
- दीपक खेडेकर, अध्यक्ष, जय भवानी प्रतिष्ठान हर्णै
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.