कोकण

-त्या खड्ड्याच्या परीसरात सुरक्षित उपाययोजना

CD

‘त्या’ खड्डयाजवळ सुरक्षितेच्या उपाययोजना
मिऱ्या-नागपूर महामार्ग; सजग नागरिकांमुळे अनर्थ टळला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. रत्नागिरी शहराजवळील जे. के. फाईल्स येथे जीवघेणा खड्डा आहे. हा खड्डा वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नसल्याने अपघाताचीही शक्यता होती. ही बाब लक्षात आल्यानंतर सजग नागरिकांनी तातडीने त्या खड्ड्याच्या परिसरात सुरक्षित उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यानुसार ठेकेदाराने तिथे सुरक्षित पट्ट्या लावल्या आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रत्नागिरीतील उद्योजक चंद्रशेखर जोशी, शिक्षक प्रभाकर शिंदे यांच्या जे. के. फाईल्स येथील तो जीवघेणा खड्डा लक्षात आला होता. त्यांनी ही बाब भाजप शहर उपाध्यक्ष शैलेश बेर्डे यांच्या निदर्शनास आणून दिली. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बेर्डे यांनी तत्काळ संबंधित महामार्ग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार त्यांच्यापुढे मांडला. याची दखल घेत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तेथील सुपरवायझरला खड्ड्याभोवती वाहनचालकांच्या दृष्टीस पडेल अशा पद्धतीने कापडी पट्टीचे कुंपण करण्यास सांगितले. तिथे काळोख असल्यामुळे न दिसणारा हा खड्डा दिसण्यासाठी संबंधित यंत्रणेने लाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रात्री त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्यामुळे गोंधळ उडत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT