कोकण

पुष्पसेन सावंत कॉलेजतर्फे ''तंबाखूमुक्त युवा अभियान''

CD

swt186.jpg
11519
डिगसः ‘नशामुक्त भारत’ अभियानात विद्यार्थ्यांसोबत उपस्थित प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, प्रा. शंकर मुसळे आदी.

पुष्पसेन सावंत कॉलेजतर्फे
‘तंबाखूमुक्त युवा अभियान’
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ः श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कुडाळच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने व रोटरॅक्ट क्लबच्या सहकार्याने डिगस येथे ‘नशामुक्त भारत अभियान-तंबाखूमुक्त युवा अभियान’ हा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील युवक, विद्यार्थी व नागरिकांमध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडी व इतर व्यसनांचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणे हा होता. तंबाखू सेवनामुळे होणारा तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचे विकार, हृदयरोग तसेच सामाजिक व आर्थिक नुकसान याविषयी सविस्तर माहिती एनएसएस स्वयंसेवकांनी दिली. घोषवाक्ये, जनजागृती फलक, थेट संवाद व मार्गदर्शनाच्या माध्यमातून व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
युवकांना आरोग्यदायी सवयी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. हा उपक्रम प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली व एनएसएस समन्वयक प्रा. शंकर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपसमन्वयक प्रा. गणू गावडे, प्रा. सलीना फर्नांडिस व प्राची पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या अभियानास डिगस गावातील ग्रामस्थ, युवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Alphonso mango : रत्नागिरी हापूस आता एआय तंत्रज्ञानावर; मोबाईल ॲपवरून बागेचे व्यवस्थापन होणार, हापूस शेतीत डिजिटल क्रांती

'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक सुरू

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

SCROLL FOR NEXT