कोकण

वन अधिकाऱ्यांचा संवाद

CD

वाडी जैतापूरवासीयांशी वनविभागाचा संवाद
बिबट्याची दहशत ; रात्री बाहेर न पडण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १८ : तालुक्यातील वाडी जैतापूर येथे बिबट्याचे सतत दर्शन होऊ लागल्यामुळे तेथील ग्रामस्थांबरोबर संवाद साधत वन विभागाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
तालुक्यातील वाडी जैतापूर गाव व परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे वनपाल राणबा परशुराम बांबरगेकर यांनी तातडीने गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी वनपाल बांबरगेकर यांनी बिबट्याच्या वावराबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती देत कोणकोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. याबाबत मार्गदर्शन केले. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच बिबट्याच्या संदर्भात योग्य ती खबरदारी घेणे हाच प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर न जाणे, घराजवळील परिसरात प्रकाश व्यवस्था ठेवणे, लहान मुले व पाळीव जनावरांची योग्य काळजी घेणे अशा सूचना देण्यात आल्या. पोलिसपाटील बाळकृष्ण कासार, सरपंच सुनीता कासार यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. वन विभागाकडून पुढील काळातही आवश्यक ती दक्षता व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

सोने-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, ३ वर्षांची वाढ झाली कमी; जाणून घ्या आज किती भाव

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Pune Trekking : ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा इशारा! पर्यटकांनो साहस करा; पण जपून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे आवाहन

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इतरांना धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT