कोकण

विवाहाच्या दिवशीच नोंदणी, प्रमाणपत्र सुपूर्द

CD

-rat१८p११.jpg-
P२५O११५५५
मंडणगड ः गोठे येथे नवविवाहित दाम्पत्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करताना नोंदणी निबंधक दीपक टेमकर.
-----
विवाह अन् नोंदणी एकाच दिवशी
गोठे ग्रामपंचायतीचा उपक्रम; वधू-वरांना प्रमाणपत्र सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ ः राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गोठे गट ग्रामपंचायतीने लोकाभिमुख उपक्रम राबवला आहे. नवविवाहित दाम्पत्यांची विवाहाच्या दिवशीच नोंदणी करून ऑनलाईन विवाह प्रमाणपत्र दिले जाते. या उपक्रमामुळे नागरिकांना त्वरित व सुलभ सेवा उपलब्ध होत असून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम प्रशासनाचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
मौजे गोठे येथे पुनम भुवड व देव्हारे मालेगाववाडी येथील अमोल शिंदे यांचा विवाह झाला. या प्रसंगी जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी निबंधक व ग्राम पंचायत अधिकारी दीपक टेमकर यांच्या हस्ते नवविवाहित वधू वरांना ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. विवाहाच्या मंगलदिनीच कायदेशीर कागदपत्रे प्राप्त झाल्याने वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला उपसरपंच संजय बोतरे, गोठे गावचे ग्रामीण अध्यक्ष शांताराम भुवड, मुंबई मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भुवड, तसेच गोठे व मालेगाववाडी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे ग्रामपंचायतीच्या सेवा अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख होत असून भविष्यातही अशाच उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार; पण कोणत्या आणि सुविधा काय असणार? जाणून घ्या...

T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार; सूर्यकुमार यादवची टीम बघा कोणत्या तारखेला शेजाऱ्यांना परत हरवणार

सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन आणि दाढी... राजकुमार रावला नक्की काय झालय? Viral Video

Latest Marathi News Update : 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट,तक्रारदार संदीप पाटील यांचे पोलिसांवरच गंभीर आरोप

Horscope : उद्या 17 फेब्रुवारी! मंगळ देवाच्या कृपेने 3 राशींचे नशीब बदलणार; लगेच सुरू होतोय धनयोग, आरोग्याची मोठी समस्या संपणार

SCROLL FOR NEXT