कोकण

दापोलीच्या निळ्याशार समुद्रात डॉल्फीनच्या उड्या

CD

-rat१८p१४.jpg-
२५O११५६२
दापोली ः आंजर्ले येथील समुद्रातील डॉल्फिन
-rat१८p१५.jpg-
२५O११५६३
आंजर्ले समुद्रातील सफरीवेळी उड्या मारणारे डॉल्फिन पाहायला मिळतात.
------
दापोलीतील निळ्या लाटांवर डॉल्फिनचा जलवा
आंजर्ले, हर्णै, लाडघर किनारी पर्यटन बहरले : तपमान घसरल्याने अनकुल वातावरण
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १८ : थंडीची चाहूल लागताच मिनी महाबळेश्वर दापोली तालुक्यात निसर्गाने पुन्हा एकदा आपले अद्भुत सौंदर्य उधळून दिले आहे. निळ्याशार समुद्राच्या लाटांवर उड्या मारत संचार करणाऱ्या डॉल्फिन माशांनी आंजर्ले किनारपट्टीवर हजेरी लावल्याने दापोली पर्यटनाला नवे आकर्षण मिळाले आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाच किमान १० फुटी डॉल्फिन पर्यटकांनी पहिल्यांदाच पाहिल्याने पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून दापोलीची किनारपट्टी सध्या ‘डॉल्फिन हॉटस्पॉट’ ठरत आहे.
डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दापोली तालुक्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने डॉल्फिनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुरूड, हर्णै, लाडघर आणि आंजर्ले या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात डॉल्फिन दिसून येत आहेत. यामध्ये सर्रास किमान ८ ते १० फुटाचे डॉल्फिन वारंवार दर्शन देत असल्याने हा परिसर पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
कोकण किनारपट्टी डॉल्फिनसाठी नैसर्गिकदृष्ट्या पोषक मानली जाते. येथे विविध प्रकारचे मासे व सागरी जीव मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने डॉल्फिनसाठी हा भाग आदर्श अन्नस्त्रोत ठरतो. किनाऱ्यालगतचा उथळ, चिखलयुक्त समुद्रतळ डॉल्फिनच्या संचारासाठी सोयीचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जिज्ञासू व खेळकर स्वभावामुळे डॉल्फिन बोटींच्या आसपास उड्या मारताना, आवाज करताना दिसतात आणि त्यामुळे पर्यटकांना त्यांचे दर्शन अगदी जवळून घडते. कोकण किनारपट्टीवर हम्पबॅक व बॉटलनोज डॉल्फिन या प्रजाती नियमितपणे आढळतात.
सध्या आंजर्ले किनाऱ्यावर डॉल्फिन दर्शनासाठी सहा फायबर नौका कार्यरत असून देश-विदेशातून येणारा बहुतांश पर्यटक डॉल्फिन सफर केल्याशिवाय दापोली सोडत नाही. साधारणतः ८ ते १० फूट लांबीचे डॉल्फिन येथे नेहमी दिसतात; मात्र अलीकडेच सुमारे १० फूट लांबीच्या मोठ्या डॉल्फिनचे दर्शन झाल्याने प्रथमच आलेल्या पर्यटकांना विशेष आनंद व आश्चर्य वाटले. बोटीतूनच या दृश्याचे छायाचित्रण व चित्रीकरण करण्यात आले असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. निसर्गाच्या या अनोख्या भेटीमुळे दापोलीचे पर्यटन वैभव अधिकच उजळून निघाले आहे.
---
कोट
डिसेंबर महिन्यात समुद्रातील तापमान घटल्यामुळे डॉल्फिन माशांचा किनाऱ्यालगत वावर वाढतो. तसे डॉल्फिन मासा हा आपल्या कुटुंबासोबत मुक्त संचार करत असतो. त्यामध्ये नर मादी आणि पिल्लांचा समावेश असतो. त्यामुळे मोठे डॉल्फिन हे किमान ८ ते १० फुटाचे असतात आणि त्यांची पिल्ले साधारण ४ ते ५ फुटाची असतात. या दिवसात त्यांच समुद्रामध्ये उड्या मारणे, बागडणे सुरूच असत. पर्यटकांसाठी मात्र हे आनंददायी दृश्य आहे. प्रथमच पाहिलेल्या पर्यटकांना त्याचे नावीन्य आणि कुतूहल वाटण हे साहजिकच आहे.
--साईराज आरेकर, आंजर्ले, डॉल्फिन सफर नौकामालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT