कोकण

विजेचा खांब तुटून दोन कामगार जखमी

CD

कीटकनाशक प्यायलेल्या
तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी : अज्ञात कारणातून कीटकनाशक प्यायलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान १८ डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. दीपक बाबू माने (वय ३०, रा. पटवर्धनवाडी उद्यमनगर, रत्नागिरी) असे त्या तरुणाचे नाव आहे. दीपक माने याने १० डिसेंबरला अज्ञात कारणातून राहत्या घरी कीटकनाशक प्यायले होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर नातेवाईकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दीपकला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १७ डिसेंबरला दीपकला पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी दीपकचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


विजेचा खांब तुटून
दोन कामगार जखमी
रत्नागिरी ः शहरानजीकच्या मिरजोळे हनुमाननगर येथे सिमेंटचा विजेचा खांब अचानक तुटल्याने त्या खांबावर काम करणारे दोन कामगार पडून जखमी झाले. ही दुर्घटना गुरुवारी (ता. १८) दुपारी घडली. साधन बुद्धिब चौधरी (वय २४) व फुलचंद सुखदेव चौधरी (२३, रा. मिरजोळे, रत्नागिरी) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साधन आणि फुलचंद हे दोघेही गुरुवारी दुपारी मिरजोळे-हनुमाननगर येथे ३३ केव्ही वाहिनीचे काम करण्यासाठी सिमेंटच्या खांबावर चढले होते. हे काम करत असताना सिमेंटचा खांब तुटल्याने दोघेही खाली पडून जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT