FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Cabo Verde Historic World Cup Run: सहा लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या केप वर्दे संघाने फिफा वर्ल्ड कपमध्ये इतिहास घडवला आहे. त्यांनी नॉकआऊटमध्ये प्रेवश करण्यात यश मिळवले आहे.
Cabo Verde | FIFA World Cup 2026

Cabo Verde | FIFA World Cup 2026

Sakal

Updated on

Cabo Verde Advance to World Cup Knockouts: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत. गुरुवारी इक्वेडोरने जर्मनीला हरवत उलटरफेर घडवला, तर आता शुक्रवारी केप वर्देने पहिल्याच प्रयत्नात वर्ल्ड कपची नॉकआऊट फेरी गाठण्यात यश मिळवलं आहे.

सहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या केप वर्देने शुक्रवारी सौदी अरेबियाविरुद्ध गोलशून्य बरोबरी केली आणि एच ग्रुपमध्ये दुसरे स्थान मिळवत नॉकआऊट फेरी गाठली. केप वर्दे या स्पर्धेत अद्याप हरलेले नाहीत. त्यांनी पहिल्या तिन्ही सामन्यात बरोबरी साधली आहे.

Cabo Verde | FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026: कतारवर विजय मिळवून बोस्नियाची आगेकूच; कॅनडाला नमवून स्वित्झर्लंड अव्वल
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com