-rat१९p१५.jpg-
२५O११७९८
देवरूख ः काव्य सादरीकरण करताना प्रा. बापट आणि वादक भाटये.
-----
‘कुटुंब रंगलय’ कार्यक्रमाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २० ः श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयात प्रा. विसूभाऊ बापट यांनी सादर केलेल्या ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या त्यांच्या खास शैलीतील काव्यवाचनाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्कारभारती उत्तर रत्नागिरी जिल्हा आणि श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी प्रा. विसूभाऊ बापट, संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा समिती महामंत्री मंगेश बापट, आनंद बोंद्रे, कुमार भाट्ये यांचे स्वागत केले. बापट यांनी काव्यवाचनाची सुरुवात गणेश व सरस्वती आराधनेने केली. दीड तास रंगलेल्या काव्यमैफलीत गीते, कविता, काव्य, वात्रटिका, चारोळी, बालगीते, बडबड गीते, विडंबन, लोचटिका, स्वातंत्र्य गीते या द्वारे रसिकांशी संवाद साधून सादरीकरणातून वाहवा मिळवली. कुमार भाट्ये यांनी तबलासाथ दिली.
---