swt1915.jpg
11853
जयंत बरेगार
‘लाचप्रकरण तपासात दिरंगाई
करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’
जयंत बरेगारः कुंभारमाठ, आडवलीप्रकरणी अधीक्षकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः वनविभागाच्या कुडाळ परिक्षेत्रातील कुंभारमाठ येथील बोगस वृक्षतोड आणि आडवली (ता. मालवण) येथील सॉ-मिलवर लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन वनक्षेत्रपाल व त्यांच्या सहकाऱ्यांवर २०१७ मध्ये गुन्हा दाखल होऊनही ८ वर्षे तपास प्रलंबित राहिल्याने आरटीआय कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी तपास करण्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
मालवण पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल झालेला हा गुन्हा तपासासाठी आचरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. आचरा पोलिसांनी काहींना अटक केली होती. मात्र, मुख्य संशयित यांनी मुंबई उच्च न्यायालयातून चार्जशीट दाखल करण्यास स्थगिती मिळवली होती. मात्र, २०१७ ते २०२५ या प्रदीर्घ कालावधीत मालवण पोलिसांनी आपल्या हद्दीतील गुन्ह्याचा कोणताही तपास केला नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.
या गंभीर दिरंगाईबाबत श्री. बरेगार यांनी १७ डिसेंबरला मालवण पोलिसांना पत्र देऊन तपास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर होणार आहे. त्यापूर्वी तपासाबाबत लेखी माहिती न मिळाल्यास पोलिसांच्या या भूमिकेबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा श्री. बरेगार यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.