कोकण

केळकर हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

CD

11915
वाडा : येथील अ. कृ. केळकर हायस्कूलच्या मान्यवरांच्या हस्ते स्नेहसंमेलनात हस्तलिखिताचे प्रकाशन झाले.

केळकर हायस्कूलचे
स्नेहसंमेलन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० : तालुक्यातील वाडा येथील अ. कृ. केळकर हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. विद्यार्थ्यांनी चौकस वृत्ती बाळगावी, असे आवाहन मंदाकिनी गोडसे यांनी केले.
मंचावर गोडसे यांच्यासह डॉ. दत्तप्रसाद सावंत, संस्था उपाध्यक्ष सदानंद पवार, स्थानिक समिती अध्यक्ष शांताराम पुजारे, शाळा समिती अध्यक्ष हर्षद जोशी, मुख्याध्यापिका स्मिता तेली, माजी पर्यवेक्षिका उल्का जोशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शैक्षणिक वर्षात झालेल्या विविध स्पर्धा, तसेच मागील वार्षिक परीक्षेवर आधारित, म. द. पाटणकर वक्तृत्व स्पर्धा, पानाफुलांची रांगोळी, होतकरू विद्यार्थी शिष्यवृत्ती, नेने ग्रंथालयामार्फत झालेल्या विविध स्पर्धा, तसेच क्रीडा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित केली. यावर्षी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वीर शिर्सेकर व कुंजल गांवकर यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. सावंत यांनी, मैत्री जपत, स्वतःची बलस्थाने ओळखून आत्मपरीक्षण करायला हवे, असे सांगितले. हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सौ. तेली यांनी प्रास्ताविक केले. सचिन मोरे व प्रियांका पाटील यांनी बक्षीस वाचन केले. मिलिंद लेले यांनी परिचय केला. भूषण दातार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Ropeway रायगडला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रोपवे सेवा ६ दिवसांसाठी बंद

राजपाल यादव अखेर जेलमधून बाहेर, म्हणाला...'बॉलिवूडमध्ये 30 वर्ष मेहनत घेऊनही...'

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्रच मिळणार ? 'या' दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे

मुंबईत MMRDAचा जमीनविक्रीचा सपाटा, ४ वर्षात १० हजार कोटींचे भूखंड विकले; आणखी ११ हजार कोटींचे भूखंड विकणार

Pune News: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार! प्रभाग कार्यक्रम जाहीर; पुणे जिल्ह्यातील ८७३ ग्रामपंचायतींसाठी हालचाली

SCROLL FOR NEXT