कोकण

चिपळूणच्या तीन महिलांना रिले आयर्न मॅनचा बहुमान

CD

-ratchl२०२.jpg-
P२५O११९९९
चिपळूण ः गोवा येथील आयर्न मॅन स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या चिपळूणच्या महिला खेळाडू.
----
चिपळुणाच्या ‘टीम शक्ती’चा आयर्न मॅन पराक्रम
गोव्यात स्पर्धेचे आयोजन ; आंबेकर, डॉ. वाघमारे, गणपत्ये यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः पणजी येथे आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ७०.३ या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये चिपळुणातील तीन महिला खेळाडूंनी रिले प्रकारामध्ये भाग घेऊन पहिल्याच प्रयत्नात मोठे यश संपादन केले आहे. या टीम शक्तीने कोकणातील पहिल्या महिला रिले आयर्न मॅन होण्याचा बहुमान पटकावला.
आयर्न मॅन ७०.३ या स्पर्धेत पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तीन प्रकारांचा अंतर्भाव होता. रिले प्रकारामध्ये तीन खेळाडू स्वतंत्रपणे यातील प्रत्येक खेळामध्ये भाग घेतात. यामध्ये सर्वप्रथम समुद्रात पोहणे १.९ किमी, त्यानंतर सायकलिंग ९० किलोमीटर, त्यानंतर धावणे २१.१ किलोमीटर असे अंतर एकूण साडेआठ तासांमध्ये पार करावयाचे होते. चिपळूणच्या टीम शक्तीमधील नीशा आंबेकर यांनी १.९ किलोमीटर स्विमिंग केवळ ४८ मिनिटांत पूर्ण केले. त्यानंतर लगेच उन्हामध्ये तसेच अतिशय चढ-उताराच्या रस्त्यावर डॉ. मनीषा वाघमारे यांनी ९० किलोमीटर सायकलिंग ३ तास ५१ मिनिटांत पूर्ण केले. डॉ. अश्विनी गणपत्ये यांनी दुपारी १२ वा. भरउन्हात सुरू करून अत्यंत चढाच्या रस्त्यावर २१.१ किलोमीटर रनिंग २ तास ५२ मिनिटांत पूर्ण केले. एकूण ७ तास ४२ मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करत टीम शक्तीने कोकणातील पहिल्या महिला रिले आयर्न मॅन होण्याचा बहुमान पटकावला. आपापले व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक महिने सराव केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब व नागरिकांनी त्यांचा सन्मान केला. पुढील वर्षी वैयक्तीक आयर्न मॅन ७०.३ स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण करण्याचा मानस या तिघींनी बोलून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Chandrakant Patil : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्यात अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

मंत्रालयात लाचखोरी मोठा कलंक, मला कल्पना नव्हती; मंत्री झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update :डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी गोपाळ बदनेचा जामीन अर्ज फेटाळला

Mumbai Metro Expansion: ट्रॅफिकला ब्रेक! मुंबईत ९२ किमी मेट्रोचं जाळं, उपनगरांना मोठा दिलासा, कुठे सुरू होणार नवी मेट्रो?

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT