कोकण

-चिपळुणात एकाच दिवशी बांधले ५५० बंधारे

CD

-ratchl२०१.jpg-
२५O११९९८
चिपळूण - ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागातून बंधारे घालताना महिला व ग्रामस्थ.
---
चिपळुणात एका दिवशी बांधले ५५० बंधारे
लोकसहभागाने मोहीम यशस्वी; टंचाईकाळात नागरिकांना मिळणार दिलासा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः तालुक्यात उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईला आळा बसावा, जनावरासह पशुपक्ष्यांना पाणी मिळावे, विहिरीतील पाणीपातळी वाढावी यासाठी तालुक्यात एकाच दिवशी मिशन बंधारे मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकाच दिवसात तालुक्यात ५५० बंधारे ग्रामपंचायत स्तरावर बांधण्यात आले. १३० ग्रामपंचायतीत राबवलेल्या या मोहिमेत ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय विद्यार्थी, युवक, ग्रामस्थ व महिला सहभागी झाले होते. आतापर्यंत तालुक्यात ८०० बंधारे झाले असून, एक हजार बंधारे उभारणार असल्याचे गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांनी सांगितले.
तालुक्यात लोकसहभाग व श्रमदानातून विजय बंधारे १५०, वनराई ५०, कच्चे बंधारे ३५० असे ५५० बंधारे एकाच दिवसात बांधण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान ६.० हे अभियान तालुक्यात राबवण्यासाठी मिशन बंधारे मोहीम राबवण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतनिहाय बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बैठक घेत मार्गदर्शन केले. तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटनिहाय अधिकाऱ्यांची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती केली. पंचायत समितीमधील खातेप्रमुखांवर त्याची जबाबदारी सोपवली. प्रत्येक गावात किमान १० बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले. १८ डिसेंबरला तालुक्यातील १३० ग्रामपंचायतीत एकाच दिवशी मोहीम राबवण्यात आली. बंधाऱ्यात साठलेले पाणी पाहून सर्व पथक प्रमुखांनी समाधान व्यक्त केले. बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाल्याने नदी, नाले, शेजारील विहिरीची पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
--
बचतगटासह, तरुण मंडळांचा सहभाग
बंधारे बांधण्यासाठी बचतगटाच्या महिला, तरुण मंडळे, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, गावातील शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग घेण्यात आला. या सर्वांच्या सहयोगातून दिवसात ५५० बंधारे बांधण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

Marathwada News : “साहेब, आम्हाला पण भीती वाटते!” पीक वाचवायचं की जीव; निल्लोड परिसरात अंधारात गहू भरणी करताना शेतकरी धोक्यात!

SCROLL FOR NEXT