कोकण

रत्नागिरी ः समीरकुमार आडाव-पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

CD

rat२३p२२.jpg-
२५O१२९११
रत्नागिरी ः शिक्षणाधिकारी मेंगाडे यांच्याकडून आदर्श शेतकरी पुरस्कार स्वीकारताना समीरकुमार आडाव-पाटील. शेजारी विलास राणे, सुनील मयेकर आदी.
------
समीरकुमार आडाव-पाटील
यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २३ः उच्चशिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करणारे युवा प्रगतशील शेतकरी समीरकुमार आडाव-पाटील यांना मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. पाटील यांना हा पुरस्कार एमटीडीसीचे व्यवस्थापक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मेंगाडे, संस्थेचे अध्यक्ष सुनील मयेकर, सचिव विनायक राऊत, निवृत्त कृषी अधिकारी विलास राणे, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भुवड, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व संचालक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
पाटील यांनी एमएसस्सी हॉर्टिकल्चर (उद्यानविद्या), एमए पोलिटिकल सायन्स आणि फार्मसी असे शिक्षण पूर्ण केले आहे. काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर करून त्यांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यांच्या शेतीमधील विविध उपक्रमांची दखल घेऊन संस्थेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story: मेहनतीच्या बळावर तिन्ही मुले डॉक्टर; एकाची एमबीबीएस तर दोघांची पदव्युत्तरला एंट्री, वडिलांनी स्वत: केला स्वयंपाक!

Viral Video: 'डोगेश भाई' ने आयआयटी मुंबईच्या क्लास रुममध्ये लावली हजेरी, श्वानाच्या व्हायरल व्हिडिओने घातला धुमाकूळ

Central Railway: चाकरमान्यांना दिलासा! होळी, उन्हाळी सुट्टीसाठी विशेष रेल्वे, १००हून अधिक गाड्यांचे आयोजन; पाहा वेळापत्रक

Post Office Scheme: या सरकारी योजनेत पैसे दुप्पट! FD पेक्षा कशी वेगळी? कोण करू शकतो गुंतवणूक? जाणून घ्या सर्व माहिती

Pune News: सकाळ + स्टडीरूमच्या ‘ग्रेट भेट’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांचा दिशादर्शक संवाद

SCROLL FOR NEXT