कोकण

-चिपळुणात तीन मित्र तीन पक्षांचे तालुकाध्यक्ष

CD

-ratchl२४३.jpg-
P२५O१३१५६
प्रकाश साळवी
-ratchl२४४.jpg-
२५O१३१५७
विनोद भूरण
-ratchl२४५.jpg-
२५O१३१५८
नितीन ठसाळे
-----
तीन जिवलग वेगवेगळ्या पक्षांचे तालुक्याध्यक्ष
चिपळुणातील साळवी, भूरण, ठसाळे; एकाच गावातील, एकाच पक्षातही होते कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्राबल्य असलेल्या शहरालगतच्या खेर्डी येथील तीन पदाधिकारी मोठ्या राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून प्रतिनीधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि भाजपचे हे तिन्ही तालुक्यातील खेर्डी गावातलेच. विशेष म्हणजे चांगले मित्र असलेले हे तिन्ही तालुकाध्यक्ष काही वर्षापूर्वी एकाच संघटनेत, पक्षात कार्यरत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते यांच्या मुशित तयार झालेले प्रकाश साळवी, विनोद बुरण, नितीन ठसाळे हे तिन्ही तालुकाध्यक्ष आगामी काळात एकमेकांविरोधात राजकीय संघर्षात भिडणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी खेर्डी ग्रामपंचायतीवर गेली २० वर्षे वर्चस्व ठेवले आहे. खताते हे पुण्यातून गावी खेर्डीत १९९० च्या सुमारास आल्यानंतर १९९५ ला ग्रामपंचायतीच्या राजकारणात प्रवेश केला. अल्प कालावधीत त्यांनी राजकारणाची घडी बसवली. सध्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश साळवी आणि भाजप तालुकाध्यक्ष विनोद भूरण हेही गेल्या काही वर्षात जयंद्रथ खताते यांच्या सोबत संघटनेत कार्यरत होते. माजी सरपंच प्रशांत यादव राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर ते कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष झाले. खताते यांनी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी नितीन ठसाळे यांच्यावर सोपवण्यात आली. ठसाळे यांनी सरपंचपदानंतर पंचायत समिती सदस्य म्हणूनही विजयी झाले होते. आता ते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भाजप तालुकाध्यक्ष विनोद भूरण हे देखील एकेकाळी खताते यांच्याच संघटनेतले. त्यांनीही ग्रामपंचायतीत उपसरपंच म्हणून कामकाज करताना व्यवसाय आणि राजकारणात कक्षा वाढवल्या आहेत. लियाकत शाह यांची कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर तेथे खेर्डीतील प्रकाश साळवी यांची वर्णी लागली. साळवी यांनीही खेर्डी ग्रामपंचायतीत उपसरपंच म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी जिल्ह्यात कुंभार समाजाला संगठीत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. साळवी तालुकाध्यक्ष झाल्यानंतर

राजकीय संघर्षात भिडणार
योगायोगाने साळवी, भूरण, ठसाळे हे तीन मोठ्या राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष एकाच गावाला मिळाले आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगले मित्र असलेले तिन्ही तालुकाध्यक्ष राजकीय संघर्षात भिडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

SCROLL FOR NEXT