कोकण

आरोंदा हायस्कूलमध्ये २९ ला चित्रकला स्पर्धा

CD

आरोंदा हायस्कूलमध्ये
२९ ला चित्रकला स्पर्धा
आरोंदा, ता. २४ः आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, आरोंदा संचलित आरोंदा हायस्कूल यांच्या वतीने डॉ. पी. वाय. नाईक पुरस्कृत, पत्नी (कै.) पुष्पा प्रभाकर नाईक स्मृतिप्रित्यर्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सोमवारी (ता.२९) येथील हायस्कूल येथे पार पडणार आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील शाळांसाठी ही स्पर्धा खुली असून पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटांत घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटात प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय दोन हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ एक हजार रुपये रोख पारितोषिकासह प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटासाठी पाच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. चित्रकलेचे विषय स्पर्धेच्या वेळी दिले जातील. स्पर्धा सकाळी दहा वाजता सुरू होऊन निकाल व पारितोषिक वितरण त्याच दिवशी दुपारी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी लागणारे कागद आयोजकांकडून पुरविले जातील, तर रंग व इतर साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणावयाचे आहे. स्पर्धकांसाठी भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी दिनांक २५ डिसेंबरपर्यंत स्वतः येऊन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नावनोंदणी करावी. नावनोंदणीसाठी कलाशिक्षक चंदन गोसावी, मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Marriage Scheme : शेतकरी वराशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर 10 लाख ठेवा; शेतकरी संघाची मागणी, नोकरीत आरक्षणाचाही आग्रह

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT