कोकण

मनमोहक नृत्याविष्कारांनी रसिक मुग्ध

CD

swt2518.jpg
13392
पाटः डान्स फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी दिलखेचक नृत्ये सादर केली.

मनमोहक नृत्याविष्कारांनी रसिक मुग्ध
पाटमधील डान्स फेस्टिव्हलः मराठी, हिंदी गीतांवरील नृत्यांनी रंगत
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २५ः मराठी, हिंदी गाण्यांवर विविध, मनमोहक नृत्ये सादर करीत येथील नृत्यकला डान्स ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते नृत्यकला डान्स ॲकॅडमीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या ‘नृत्यकला डान्स फेस्टिव्हल २०२५’चे.
पाट येथील आदिशक्ती मंगल कार्यालयामध्ये रंगलेल्या या नृत्य महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध व दिलखेचक असे नृत्याविष्कार सादर करत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक उमेश पाटील यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी व्यासपीठावर चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमी कुडाळ संस्थापक व अध्यक्ष रवी कुडाळकर, कुडाळ नगरपालिका नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, राकेश कांदे, स्वाती पाटील, प्रसाद दाभोलकर, संतोष हळदणकर, केळुस सरपंच योगेश शेटये, प्रणाली मुळये, भारती फणसेकर, सलमान मेमन, निवेदक नीलेश गुरव, शैलेश तांबे, निखिल कुडाळकर, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते. नृत्यकला डान्स ॲकॅडमी म्हापण टीमचे सर्व सहकारी व रसिक प्रेक्षक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत नृत्य महोत्सवाला व नृत्यकला डान्स ॲकॅडमीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नगरसेवक श्री. कुडाळकर यांनी, आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून आपल्या टीमला जे काही सहकार्य करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. रवी कुडाळकर यांनी आपल्या वीस वर्षांच्या प्रवासाविषयी भावना व्यक्त करताना, ग्रामीण भागातील मुला-मुलींना संधी मिळावी म्हणून नृत्यकला डान्स ॲकॅडमी स्थापना केली असल्याचे सांगितल. तसेच नृत्य प्रशिक्षक निखिल कुडाळकर यांचे विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे लहान मुलांना नृत्य क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी ११ जानेवारीला कुडाळ मराठा समाज हॉलमध्ये ''अप्सरा'' या लहान मुलांच्या शोचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. प्रास्ताविक नीलेश गुरव यांनी, सूत्रसंचालन शैलेश तांबे यांनी केले.

BMC निवडणुकांचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला! ८०% कर्मचारी निवडणूक ड्युटीवर, मतदान महत्त्वाचे की उपचार?

Latest Marathi News Live Update : रंगशारदा येथे भाजप आणि शिवसेना नेत्यांची होणार बैठक

Viral Video: ''ले बेटा.. किरीश का सुनेगा गाना'', तुम्ही व्हिडीओ बघितला का? कोण आहे तो व्हायरल बॉय?

Akola Political : अकोल्यात भाजप व काँग्रेसची ‘बार्गेनिंग’ वाढली; फॉर्म्युला ठरेना; उमेदवारांची धाकधुक वाढली!

Dream Job Loss: अपयश नाही, नवी संधी! स्वप्नातील नोकरी गेल्यावर नव्याने सुरुवात कशी कराल? 'या' टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT