कोकण

राणी पार्वतीदेवी प्रशालेचे कथाकथन स्पर्धेमध्ये यश

CD

13535

राणी पार्वतीदेवी प्रशालेचे
कथाकथन स्पर्धेमध्ये यश

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः येथील श्रीराम वाचन मंदिरतर्फे आयोजित द. कृ. वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धेत आठवी ते दहावी गटात राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या अस्मी मांजरेकर, तर पाचवी ते सातवी गटात राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या पार्थ सावंत याने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीराम वान मंदिरचे सचिव रमेश बोंद्रे, संचालक राजेश मोंडकर, सहकार्यवाह बाळ बोर्डेकर, परीक्षक वाय. पी. नाईक, रश्मी पावसकर, ग्रंथपाल महेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी श्री. बोंद्रे यांनी, ही स्पर्धा पुढील वर्षीपासून जानेवारीत घेण्यात येईल, असे जाहीर केले. पाचवी ते सातवी गटात कोमल गावडे (मिलाग्रीस हायस्कूल) हिने द्वितीय, श्रेयस हेमंत रेडकर (मदर क्विन्स इंग्लिश स्कूल), याने तृतीय, आठवी ते दहावी गटात मृणाली पवार (आरपीडी हायस्कूल) हिने द्वितीय, ब्रह्मी निवेलकर (मदर क्विन्स स्कूल) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण वाय. पी. नाईक, रश्मी पावसकर यांनी केले. यावेळी वाचन मंदिरचे कर्मचारी महेंद्र सावंत, रंजना कानसे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची पुण्यासाठी पहिलीच डीपीसी बैठक; १ हजार ३२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

SCROLL FOR NEXT