कोकण

कुडाळात मंगळवारी सभापतींची निवड

CD

कुडाळात मंगळवारी
सभापतींची निवड
कुडाळ ः येथील नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवड प्रक्रियेसाठी मंगळवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित केली आहे. विषय समिती सभापतीची निवड झाल्यानंतर स्थायी समितीही गठित केली जाणार आहे. विषय समिती सभापती पदाची मुदत १० डिसेंबरला संपुष्टात आल्यामुळे ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निवडीसाठी दुपारी १२ ते २० मिनिटे या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे सादर करावयाची असून त्यानंतर दुपारी २ वाजता निवडीसाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे.
---
तिरोडा येथे आज
गायन, वादन स्पर्धा
आरोंदा ः नवतरुण हौशी कलाकार ग्रुप व जगद्गुरू नरेंद्राचार्य संगीत आराधना तिरोडा शाखा आयोजित गाव मर्यादित गायन व वादन स्पर्धेचे आयोजन उद्या (ता. २७) तिरोडा भरडवाडी (भवानी मंदिर जवळ) येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत मोठ्या गटासाठी अनुक्रमे ३०००, २०००, १०००, उत्तेजनार्थ ५०० रुपये, लहान गटासाठी (हार्मोनियम वादन व गायन) ३०००, २०००, १०००, उत्तेजनार्थ ५०० रुपये तसेच लहान गट पखवाज वादनासाठी ३०००, २०००, १०००, उत्तेजनार्थ ५०० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांना सुनील पेडणेकर यांनी सन्मानचिन्ह तर प्रमाणपत्र केशव पेडणेकर यांनी पुरस्कृत केली आहेत.
.....................
ओवळीयेत उद्या
रक्तदान शिबिर
ओटवणे ः ओवळीये ग्रामस्थ आणि ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २८) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ओवळीये प्राथमिक शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात ओवळीये परिसरातील इच्छुक रक्तदात्यांनी नीतेश सावंत आणि सुहास सावंत यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन ओवळीये ग्रामस्थांच्या वतीने सचिन गवस तसेच ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर यांनी केले आहे.
.....................
नांदगाव कोळंबाचा
३ मे रोजी जत्रोत्सव
नांदगाव ः भक्तांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा ३ मे रोजी आयोजित केली आहे. यानिमित्त सकाळी ८ ते ९ या वेळेत पूजाविधी, सकाळी ९ ते २ पर्यंत नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे, सायंकाळी ४ ते ८ पर्यंत महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीदेव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगावचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT