रत्नागिरी शहरात प्लास्टिकचा खच, गटारे तुंबली
रत्नागिरी ः रत्नागिरी स्मार्ट सिटी करण्याच्या घोषणा होत आहेत; मात्र शहरातील अंतर्गत भागात प्लास्टिक पिशव्यांचा खच, तुंबलेली गटारे, वाढलेली झाडेझुडपे यामुळे स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी या घोषवाक्यालाही हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. पालिका निवडणूक झाली असून, अनेक वर्षांनी नगराध्यक्षही विराजमान झाले आहेत. नगराध्यक्ष आणि निवडून आलेल्या नगरसेवकांकडून स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरीची अपेक्षा नागरिकांना आहे. त्यासाठी प्लास्टिकमुक्ती, गटारांची स्वच्छता, रस्ते दुरुस्तीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
rat26p2.jpg
P25O13555
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे मोकळ्या जागेत टाकलेला प्लास्टिकचा कचरा.
rat26p3.jpg
P25O13556
शहरातील तेलीआळी-गोडीबाव रस्त्यावरील कचरा.
rat26p4 jpg
P25O13557
शहरातील जिल्हा रक्तपेढीसमोर उघड्या गटारावर वाढलेली झाडेझुडपे
rat26p5 jpg
25O13558
रत्नागिरी ः रक्तपेढीसमोर उघडे गटार.
rat26p6 jpg
25O13559
रत्नागिरी ः मारुती मंदिर येथे वाहतूक शाखेसमोरील रस्त्यावर टाकलेला कचरा.