कोकण

धनेश

CD

RATCHL२५६.JPG
13417
चिपळूणः कार्यशाळेत प्रतीक मोरे यांनी मार्गदर्शन केले.
-------------
वड-पिंपळाशी नातं सांगणारा धनेश संकटात
प्रतीक मोरेः चिपळुणात सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः धनेश अर्थात कोकणातील बोलीभाषेतील ककणेर हा पक्षी शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने मित्र आहे. धनेश हा शेतकरी म्हणून ओळखला जातो. निसर्गाचे संवर्धन करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मोठा सहभाग आहे. या निसर्ग संवर्धन करणाऱ्या पक्ष्याला वाचवण्यासाठी चळवळ उभारावी लागेल, असे प्रतिपादन वन्यजीव संरक्षक प्रतीक मोरे यांनी केले.
चिपळुणातील सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे धनेश अर्थात् हॉर्नबिल घरटी निरीक्षण, संरक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. येथील वनविभागाच्या कम्युनिटी सभागृहात सह्याद्री संकल्प सोसायटी संस्थेच्यावतीने ही कार्यशाळा झाली. त्यामध्ये मोरे बोलत होते. त्यांनी धनेश पक्ष्याच्या जीवनचक्राविषयी अनेक उत्सुकता निर्माण करणारी व आश्चर्यकारक माहिती सांगितली.
मोरे म्हणाले, हा पक्षी कुटुंबवत्सल आहे. एकदा त्याची मादीशी जोडी जुळली की, त्यांची सोबत आयुष्याच्या शेवटपर्यंत राहते. हा पक्षी प्रामुख्याने फळे खाऊन उपजीविका करतो. ज्या फळांमध्ये पाण्याचा अंश जास्त आहे अशीच फळे खाऊन त्या फळांच्या माध्यमातून पाण्याची तहान भागवतो. तो कधीही जमिनीवरील पाणी पित नाही, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर प्रजातीच्या वृक्षावरील फळे खाऊन व घनदाट जंगलातील उंच डेरेदार वृक्षावर डोलीच्या माध्यमातून घरटे निर्माण करून आपल्या साथीदारासोबत संपूर्ण आयुष्य एकत्रितपणे घालवतात.
निसर्ग संवर्धन करणाऱ्या धनेश पक्षाच्या (ककणेर) प्रजातीला वाचवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यासाठी पक्षीप्रेमींनी चळवळ उभारावी, असे आवाहन पक्षीमित्र व सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी केले. या वेळी सागर रेडीज, प्रशांत पवार, सोहम घोरपडे, विराज आठल्ये, सुबोध सकपाळ, गजानन सुर्वे, निकेत नार्वेकर, बंटी गुढेकर, संदेश उदेग उपस्थित होते.

चौकट
वातावरण बदलामुळे जीवनचक्रावर परिणाम
धनेश पक्ष्याचा शासनाच्या प्रथम वर्ग संरक्षित वन्यजीवांमध्ये समावेश आहे; मात्र, मोठ्या वृक्षतोडीमुळे त्याचा अधिवास संपत चालला आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे त्यांचे कुटुंबचक्र बदलत चालले आहे. झाडांना फळे येण्याच्या ठराविक हंगामात या पक्ष्यांचे प्रजोत्पादन होत असे; मात्र, आता वातावरण बदलल्यामुळे झाडांना फळे येण्याचा हंगामदेखील बदलू लागला आहे. त्याचे परिणाम त्यांच्या जीवनचक्रावर होऊ लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : ३०० लोक रद्द, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी शनिवारी कामे

SCROLL FOR NEXT