कोकण

पित्रे महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

CD

पित्रे महाविद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २६ ः देवरूख येथील आठल्ये–सप्रे–पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त चार दिवसीय क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे इनडोअर व आउटडोअर क्रीडा स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला.
उद्‍घाटनप्रसंगी क्रीडा विभागप्रमुख प्रा. धनंजय दळवी यांनी प्रास्ताविक केले. लेफ्टनंट प्रा. सानिका भालेकर यांनी क्रीडा शपथ दिली. या वेळी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. विजय मुंडेकर, क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर उपस्थित होते. स्पर्धांचे निकाल (विजेते – उपविजेते या क्रमाने) असा ः वैयक्तिक स्पर्धा : बुद्धिबळ (मुले) – वेद लिंगायत, आशीर्वाद पवार. कॅरम एकेरी – मुले ः आदित्य जाधव, अथर्व बंडबे; मुली ः गायत्री निवळकर, वेदा आंबवकर. मैदानी स्पर्धा : १०० मी. – मुले ः वेदांत गवंडी, अनुष माईन; मुली: सृष्टी आग्रे, स्नेहा गावडे. २०० मी. – मुले ः वेदांत गवंडी, अनुष माईन. ४०० मी. – मुले ः वेदांत गवंडी, अनुष माईन; मुली ः दिव्या सनगले, पूर्वा वेंद्रे. ८०० मी. – मुले: देवदास पोवार, अभिषेक आग्रे; मुली: सानिका सनगले, सानिका आग्रे. थाळीफेक – मुले: सार्थक आडशे, ओम लिंगायत; मुली: पूर्वा वेंद्रे, सानिका सनगले. गोळाफेक – मुले: सार्थक आडशे, समृद्ध करंबेळे; मुली: अनुष्का अंकुशराव, भारती गोरे. लांब उडी – मुले: नितीन घाग, वेदांत गवंडी.
सांघिक स्पर्धा : कबड्डी – मुले ः ११वी वाणिज्य ‘ब’, १२वी वाणिज्य ‘ब’; मुली: १२वी संयुक्त, ११वी कला. क्रिकेट – मुले ः १२वी वाणिज्य, ११वी वाणिज्य; मुली ः १२वी संयुक्त, ११वी कला. खो-खो – मुले: ११वी कला, १२वी वाणिज्य; मुली: १२वी कला, ११वी कला. रस्सीखेच – मुले: १२वी वाणिज्य ‘ब’, १२वी संयुक्त; मुली: १२वी संयुक्त, १२वी वाणिज्य ‘ब’. व्हॉलीबॉल – मुले: ११वी वाणिज्य ‘ब’, १२वी वाणिज्य ‘ब’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT