कोकण

आरोग्याच्या हितासाठी ‘आयुष्मान भारत’ योजना लाभदायी

CD

13620

आरोग्याच्या हितासाठी ‘आयुष्मान भारत’ योजना लाभदायी

समीर घारे ः सावंतवाडी तहसील कार्यालयात शिबिराचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. २६ ः आयुष्मान भारत जन आरोग्य योजना आता केशरी आणि पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या योजनेद्वारे कुटुंबाला वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतची आरोग्य सुविधा मोफत मिळणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी आपली आयुष्मान कार्डे काढून घ्यावीत, असे आवाहन सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे यांनी केले.
​सावंतवाडी तहसीलदार कार्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना’ शिबिर उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर तहसीलदार श्रीधर पाटील, पुरवठा निरीक्षक दीपाली गोटे व उपजिल्हा रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
घारे म्हणाले, ‘जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे. शिधापत्रिकाधारकांना ही कार्डे सुलभरित्या मिळावीत, यासाठी महसूल आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सहकार्य करेल. या योजनेमुळे कुटुंबाला मोठे आरोग्य संरक्षण प्राप्त होणार आहे. तसेच सर्व धान्य दुकानदारांनी नागरिकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.’ दरम्यान, शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, नागरिकांनी संबंधित केंद्रांवर जाऊन नावनोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे.
---
आयुष्यमान कार्डे काढून घ्या!
तहसीलदार पाटील यांनी या योजनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत. भविष्यातील आरोग्यविषयक गरजा लक्षात घेता, केसरी व पांढऱ्या रेशनकार्डधारकांनी वेळ न घालवता आपली आयुष्यमान कार्डे काढून ठेवावीत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT