कोकण

विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची चमक

CD

13758

विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची चमक

सावंतवाडीत वाजपेयींच्या जयंतीनिमित्त उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त येथील पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या या उपक्रमात चित्रकला, निबंध लेखन, वक्तृत्व, वेशभूषा (फॅन्सी ड्रेस), पोस्टर मेकिंग आणि सांस्कृतिक नृत्य अशा सहा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वाजपेयी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास प्रभावीपणे रेखाटला. निबंध स्पर्धेत त्यांच्या देशहितासाठीच्या कार्याचा सखोल आढावा मांडला.
वक्तृत्व स्पर्धेत अटलजींच्या नेतृत्वगुणांवर आणि राष्ट्र उभारणीतील योगदानावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. वेशभूषा स्पर्धेत भारतासाठी योगदान देणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या भूमिका साकारून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. पोस्टर मेकिंग स्पर्धेत देशभक्तिपर घोषवाक्ये व संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले. सांस्कृतिक नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. पारंपरिक नृत्य स्पर्धेत कोलगाव माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समई नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक एस. एल. देसाई विद्यालय, पाट तर तृतीय क्रमांक येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविला.
चित्रकला स्पर्धेत अर्जुन शिर्के (मदर क्विन्स, सावंतवाडी), पोस्टर मेकिंग स्पर्धेत वैदही म्हाडगूत (जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय, वाडोस), वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी कोठावळे (राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी), वेशभूषा स्पर्धेत श्रावणी सावंत (राजा शिवाजी विद्यालय, विलवडे), निबंध स्पर्धेत अक्षरा धुमक (जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय, वाडोस) हिने प्रथम क्रमांक मिळविला. परीक्षक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष दीपक पाटेकर व प्रा. रुपेश पाटील यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुण्यांमध्ये सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, मानसी परब, अनुजा साळगावकर, संदीप साळसकर, कोकण संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांची उपस्थिती लाभली. प्रथम तीन विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविले. कार्यक्रमाचे नियोजन कोकण संस्थेचे व्यवस्थापक प्रथमेश सावंत व सहकाऱ्यांनी केले. समीर शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. दयानंद कुबल यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT