कोकण

मुक्ताई अकादमीच्या विद्यार्थ्यांना ‘बुद्धिबळा’त आंतरराष्ट्रीय रेटिंग

CD

13968

मुक्ताई अकादमीच्या विद्यार्थ्यांना
‘बुद्धिबळा’त आंतरराष्ट्रीय रेटिंग

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः मुक्ताई अकादमीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे. गार्गी सावंत, यश सावंत, पुष्कर केळूसकर, हर्ष राऊळ, अथर्व वेंगुर्लेकर, बृंधव कोटला आणि पूर्वांक कोचरेकर या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले.
अकादमीचे अध्यक्ष आणि बुद्धिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर राज्य व राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या बहुतांश मुलांनी श्री. पेडणेकरांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे. अकादमीचे २८ विद्यार्थी आंतरराष्ट्रीय रेटिंग प्राप्त आहेत. मागील दहा वर्षांत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवली आहेत. विद्यार्थी बाळकृष्ण पेडणेकर हा स्टँडर्ड, रॅपिड आणि ब्लिट्ज या तीनही प्रकारात जिल्ह्यात सर्वोच्च गुणांकन मिळवणारा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू ठरला आहे. मालवण येथील ५० टक्के दृष्टिदोष असलेला मयुरेश परुळेकर आणि जिल्ह्यातील वयाने सर्वांत लहान आठ वर्षीय खेळाडू पूर्वांक कोचरेकर हे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू आहेत. श्री. पेडणेकर सावंतवाडी शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांसोबतच कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग, कणकवली, मालवण येथील विद्यार्थ्यांना बुद्धिबळ प्रशिक्षण देतात. या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर मुक्ताई ॲकेडमी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ‘बेस्ट ॲकॅडमी’ हा पुरस्कार मिळवणारी कोकणातील एकमेव अकादमी ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT