rat28p4.jpg
13962
रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातात छंदोत्सवामध्ये विजेत्या विद्यार्थिनीला बक्षीस देताना आनंद देसाई. डावीकडून व्ही. टी. केळकर, सुनील गोसावी, डॉ. मकरंद साखळकर, श्रीकांत दुदगीकर आणि महेश नाईक.
---------
जान्हवी, ऋषिकेश आदर्श विद्यार्थी,
वीणा अष्टपैलू विद्यार्थिनी
छंदोत्सव; अभ्यंकर कनिष्ठ महाविद्यालयात बक्षीस वितरण
रत्नागिरी, ता. २८ : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात ‘छंदोत्सव’ दिमाखात झाला. विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. महाविद्यालयात आदर्श विद्यार्थी ऋषिकेश शशिकांत कोतवडेकर (१२ वी शास्त्र अ), आदर्श विद्यार्थिनी जान्हवी मनोज सावंत (१२ वी वाणिज्य अ) आणि अष्टपैलू विद्यार्थिनी वीणा योगेश काळे (१२ वी शास्त्र अ) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शाळा समिती अध्यक्ष आनंद देसाई, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक, उद्योजक कबीर मलुष्टे, २ महाराष्ट्र नेवल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रामानुजन दीक्षित, उपप्रचार्य सुनील गोसावी, विद्याधर केळकर, छंदोत्सव प्रमुख मकरंद दामले, विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.
स्पर्धांचे निकाल असे (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)- गीत गायन- ऊर्जा आपटे, श्रिया केळकर, गिरीराज लिंगायत, एकलनृत्य- जानवी कळंबटे, यामिनी पोयरेकर, ऋत्वी केदार, युगल नृत्य- लक्षवेधी सादरीकरण आयुषी नाईक आणि लावण्या नार्वेकर, समूह नृत्य- आई एकविरा ग्रुप, कला सार्थ ग्रुप, जोगवा.
रांगोळी स्पर्धा- (विषय- माझा भारत माझा अभिमान) श्रावणी नाईक व गार्गी केळकर, तन्वी पालकर, पूर्वा बिज्जरगी, प्रांजल कुडचिकर. शैक्षणिक रांगोळी स्पर्धा- (अभ्यासाशी निगडित) क्षितिज नांदिवडेकर, आर्यन सालम, वीणा काळे व हर्षाली चाळके. छायाचित्र स्पर्धा (निसर्गातील आकृतीबंध)- वरद आरेकर, निधी सुर्वे, अमन कुरूप. छायाचित्र (रंग कोकणचे)- रिद्धी ब्रीद, ज्ञानदा कातकर, अनुष्का शिंदे. चित्रकला स्पर्धा (माझे आवडते व्यक्तिमत्व)- ऋषभ कोतवडेकर, पार्थ शिरवडकर, क्षितिज नांदीवडेकर. फूड फेस्ट स्पर्धा- व्हेज क्लायमेट ग्रुप, क्विक बाईट्स ग्रुप, सेव्हन स्टार्स ग्रुप. रिल्स मेकिंग स्पर्धा- रुद्र शिवलकर, कल्पेश पालकर, ज्ञानदा कातकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.