कोकण

रत्नागिरीत बुधवारी भीमा कोरेगाव विजयदिन

CD

रत्नागिरीत बुधवारी भीमा कोरेगाव विजयदिन
रत्नागिरी, ता. २८ : रत्नागिरी शहरात भीमा कोरेगाव विजयदिन आणि थिबा राजा जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा संयुक्त कार्यक्रम थिबाराजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती (ता. जि. रत्नागिरी) यांच्या वतीने १ जानेवारी २०२६ साजरा केला जाणार आहे. सामाजिक समतेचा, स्वाभिमानाचा आणि ऐतिहासिक लढ्याचा वारसा जपणाऱ्या या दिनाचे औचित्य साधून विविध अभिवादनपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाची सुरवात सकाळी १०.३० वाजता शिवाजीनगर येथील थिबा राजा यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता डीएसपी बंगल्याशेजारी असलेल्या थिबा राजाकालीन बुद्धविहारात बुद्धवंदना घेतली जाणार आहे. ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीस अभिवादन करण्यात येईल. या कार्यक्रमांचा समारोप दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आयोजित अभिवादन सभेने होणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT