14084
14085
मित्र शिरगाव संघाची ‘आईतवार’ प्रथम
नाथ पै एकांकिका स्पर्धा; खुल्या गटाचा निकाल जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ : वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या ४८ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात खुल्या गटात मित्र शिरगाव संघाच्या ‘आईतवार’ने प्रथम क्रमांक मिळवला. अक्षर सिंधु कणकवलीच्या ‘भरकाट’ने द्वितीय तर डी.बी.जे महाविद्यालय चिपळूण संघाच्या ‘पाकिस्तानचे यान’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळविला. कलासक्त मुंबईच्या ‘पेंडुलय’ने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : दिग्दर्शन - प्रथम- डॉ. राजेंद्र चव्हाण (आईतवार), द्वितीय-सुहास वरुणकर (भरकाट), योगेश कदम (पेंडुलय), तांत्रिक अंगे - प्रथम -प्रमोद तांबे, द्वितीय - शुभम जाधव, तृतीय-साहिल देसाई. अभिनय पुरुष- प्रथम-प्रमोद तांबे (भूमिका रमा), द्वितीय-शुभम जाधव (भूमिका श्याम), तृतीय -साहिल देसाई (भूमिका सदाशिव). अभिनय स्त्री : प्रथम भाग्यश्री भोगटे (भूमिका आई), द्वितीय-मनश्री पाठक (भूमिका सीता), तृतीय-सृष्टी करंदीकर (सौम्या). उत्तेजनार्थ - सुमित घाग (भूमिका बाबा), डॉ. यशश्री कंटक (भूमिका माधवी). मामा वरेरकर लेखन पुरस्कार माजी गटविकास अधिकारी तथा लेखक विजय कदम यांना मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण तुषार भद्रे, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. प्रिया जामकर यांनी केले.
स्पर्धा पार पडल्यानंतर शालेय व खुल्या गटातील विजेत्यांना तुषार भद्रे, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. प्रिया जामकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्यवाह अॅड. एन. आर. देसाई, प्रतिष्ठानचे कार्यवाह अॅड. एन.आर. देसाई, डॉ. समीर नेवरे, विश्वस्त दामोदर खानोलकर, सीमा कोरगावकर, लीना काळसेकर, प्रसन्ना देसाई, शशिकांत उर्फ टिकू कांबळी, सिद्धेश खटावकर, शरद सावंत, राकेश काणेकर, कांचन खानोलकर, अमिता आमडोसकर, विक्रांत सामंत, महेश चिंदरकर, सोनाली कोरगावकर, सोहम राणे, धनराज दळवी, मयुर वाघमारे आदी उपस्थित होते.
-----
‘भरकाट’चे पोस्टर प्रथम
या स्पर्धेनिमित पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती. यात अक्षर सिंधुच्या ‘भरकाट’ एकांकिकेच्या पोस्टरला प्रथम क्रमांक मिळाला. विद्यामंदिरच्या ‘पडीक’ एकांकिकेच्या पोस्टरला द्वितीय तर अभिरुची कोल्हापूरच्या ठोंब्या एकांकिकेच्या पोस्टरला तृतीय क्रमांक मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.