कोकण

वेंगुर्लेत उद्यापासून क्रीडा महोत्सव

CD

वेंगुर्लेत उद्यापासून क्रीडा महोत्सव
वेंगुर्ले : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ले यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय बाल कला-क्रीडा व ‘ज्ञानी मी होणार’ महोत्सव ३० व ३१ ला होणार आहे. महोत्सवाचे उद्‍घाटन ३० ला सकाळी १० वाजता सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे माजी शिक्षणमंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्‍घाटनानंतर ‘ज्ञानी मी होणार’, समूहगायन व समूहनृत्य स्पर्धा होतील. मैदानी स्पर्धा ३१ ला कॅम्प मैदानावर सकाळी ९.३० वाजल्यापासून होणार आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी दिली.
--
आचरा येथे फेब्रुवारीत क्रिकेट स्पर्धा
आचरा : टेंबली मित्रमंडळ, आचरा यांच्या वतीने सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. विजेत्या संघास १ लाख रुपये व चषक, तर उपविजेत्यास ५० हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. ही ऑक्शन बेस लीग स्पर्धा असून एकूण १६ संघांना सहभागाची संधी देण्यात येणार आहे. सामने यूट्यूब लाईव्हद्वारे प्रसारित होणार आहेत. अधिक माहितीसाठी मंदार केरकर किंवा राजा वायंगणकर यांच्याशी संपर्क साधावा.
--------------
(रेल्वे चित्र वापरा)
खातीपुरा-मडगाव विशेष रेल्वे धावणार
कणकवली : नवीन वर्षानिमित्त वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता उत्तर पश्चिम रेल्वेने खातीपुरा-मडगाव दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खातीपुरा-मडगाव (०९७०१) ही गाडी २८ ला सायंकाळी ४.५० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीसाठी मडगाव–खातीपुरा (०९७०२) ही गाडी ३० ला सकाळी ५.४० वाजता सुटेल. ही गाडी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोडसह कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.
---
सावंतवाडी येथे उद्या विशेष सभा
सावंतवाडी : येथील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता.३०) दुपारी ३ वाजता संस्था कार्यालय, सुमीत देवस्थळी स्मृती प्रांगण येथे होणार आहे. सभेस सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह घनःश्याम गणपुले यांनी केले आहे.
---
कलंबिस्त येथे गुरुवारी जत्रोत्सव
सावंतवाडी : कलंबिस्त येथील श्री देव रवळनाथ देवस्थान मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव १ जानेवारीला साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात पूजा, रात्री पालखी मिरवणूक तसेच वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT