कोकण

वाचनातून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवा

CD

14165

वाचनातून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवा

प्रा. राजाराम राठोड; ओरोसमध्ये वक्तृत्व स्पर्धेस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २९ : वृत्तपत्र हे केवळ बातम्यांचे साधन नसून ते समाज प्रबोधनाचे आणि ज्ञानार्जनाचे एक सशक्त माध्यम आहे. आजच्या डिजिटल युगातही ‘सखोल वाचन’ ही काळाची गरज आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या ‘आचार्य’ व ‘शास्त्री’ या उपाध्या त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या उंचीचे परिमाण आहे, असे प्रतिपादन राजापूर येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांनी केले.
​जांभेकर कुटुंबीय व गुरुकुल करिअर ॲकॅडमी, ओरोसच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर वक्तृत्व स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्राचार्य डॉ. राठोड यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रिया वालावलकर, गजानन जडये, ओरोस उपसरपंच पांडुरंग मालवणकर, ॲकॅडमीच्या संचालिका श्रद्धा ढोणुकसे, प्रा. एस. जी. ढोणुकसे आणि बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज विक्रम जांभेकर उपस्थित होते.
​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गजानन जडये, जयवंत परब, सुप्रिया वालावलकर, धनश्री देऊसकर आणि प्रवीण सरवटे यांनी बक्षीस प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य केले.
​या स्पर्धेत अनुक्रमे आर्या जोईल (न.शा. पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड), श्रावणी आरावंदेकर (सातेरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, वेतोरा), आदेश खानोलकर (राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी) यांनी प्रथम तीन क्रमांक, ​उत्तेजनार्थ वेदांत नाईक (टोपीवाला ज्युनियर कॉलेज, मालवण), साक्षी साळकर (दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा), समीक्षा मर्गज (दादासाहेब वराडकर ज्युनियर कॉलेज, कट्टा) यांना गौरविले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले.
प्रा.बाजीराव जांभेकर यांनी सूत्रसंचाल केले. स्पर्धेचे परीक्षण कणकवली कॉलेज विजयकुमार सावंत व ओरोस कॉलेजचे सुभाष बांबुळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: 'आश्वासनं फसवी ठरली...'! डबेवाला संघटनेची उद्धव ठाकरेंवर नाराजी; महायुतीला पाठिंबा देत सत्ता बदलाचा इशारा

Vijay Hazare Trophy: १५ चौकार, ८ षटकार अन् दीडशतक... ध्रुव जुरेलची विस्फोटक खेळी, रिकू सिंगनेही साथ देत ठोकली फिफ्टी

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

Saptashrungi Temple : वणी साप्तश्रृंगी गडावर श्री भगवती मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले; भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था!

Latest Marathi News Live Update : उल्हास नगरमध्ये महायुती फुटली; भाजपचा शिवसेनेवर आरोप

SCROLL FOR NEXT