कोकण

मिस्त्री हायस्कूलच्या प्रतिकृतीची राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

CD

rat29p7.jpg-
O14154
देवरूख : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळवणाऱ्या मिस्त्री हायस्कूलच्या विद्यार्थिनींना बक्षीस देताना सदानंद भागवत, दीपक मेंगाणे, प्रदीप पाटील आदी.

मिस्त्री हायस्कूलच्या प्रतिकृतीची
राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
रत्नागिरी, ता. २९ : जिल्हा परिषद शिक्षण विभाग व न्यू इंग्लिश स्कूल देवरूख आणि सृजन इनोव्हेशन अँड अॅक्टिव्हिटी सेंटर आयोजित ५३व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिस्त्री हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रतिकृतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
माध्यमिक विकलांग गटात मिस्त्री हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी प्रशालेतील नववीमधील विद्यार्थिनी मुनिबा बारगीर व अरफीन वारगीर यांनी स्मार्ट ट्राफिक सिग्नल ही प्रतिकृती सादर केली. या प्रतिकृतीची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. त्यांना प्रशालेतील विज्ञानशिक्षक इम्तियाज सिद्दिकी व निशात राजवाडकर तसेच सर्व विज्ञानशिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक यांचे मार्गदर्शन लाभले. माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी विजय परिट, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम, जिल्हा विज्ञान मंडळाचे सचिव सुभाष सोकासणे आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. मार्गदर्शक शिक्षक इम्तियाज सिद्दिकी यांनी शैक्षणिक साहित्यनिर्मिती प्राथमिक गटात सहभाग नोंदवून रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.
प्रशालेच्या या यशाबद्दल सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निसार लाला, सचिव तन्वीर मिस्त्री, जाहीर मिस्त्री, शकील मजगावकर, जावेद पटेल, साबीर मजगावकर, रफीक मुकादम, इक्बाल मिस्त्री, मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT