rat29p18.jpg
14180
देवरुख ः येथील अरूंधती पाध्ये स्कूलमधील प्रदर्शनाचे उद्घाटन करताना नितीन शेडगे.
अरूंधती पाध्ये स्कूलमधील
आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनाला प्रतिसाद
देवरूख, ता. २९ ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरूंधती अरूण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, देवरूखच्या ११व्या ''वार्षिक आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन'' भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि कलाप्रेमी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कलाशिक्षक सूरज मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध चित्रे व इतर कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वर्षभरात काढलेली विविध प्रकारची चित्रे व इतर कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये निसर्गचित्र, व्यक्तीचित्र (पोट्रेट), संकल्पचित्र, कोलाज, व्यंगचित्र, भित्तीचित्र, विविध डिझाइन्स, सुलेखन (कॅलिग्राफी) इत्यादीचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी वॉटरकलर, अॅक्रेलिक कलर, ऑइल कलर, ऑइल पेस्टल, रंगीत पेन्सिल व पेन, चारकोल इत्यादी माध्यमांचा सुयोग्य वापर केला होता. १ ते १२ पर्यंतच्या वयोगटातील मुलांनी ही चित्रे रेखाटली होती. या चित्रांमध्ये सार्थक जाधव, गुंजन सार्दळ, दुर्वा खेतल, श्रीया अणेराव, दिया खामकर, वृंदा भाटकर, गार्गी खांबे, सान्वी भुरवणे, आर्या खेतल, आर्यन सावंत या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर एकापेक्षा एक सरस चित्रे साकारली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा समिती सदस्य नितीन शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
------
Rat29p11.jpg
14147
मंडणगड: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्षेत्रीय समन्वयक डॉ. उमेशकुमार बागल.
सामाजिक उत्तरदायित्व भावनेने समाजकार्य करावे
मंडणगड ः सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रत्येकाने सामाजिक कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे. आजीवन अध्ययन व विस्तार विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून, या विभागामार्फत राबवले जाणारे उपक्रम समाजसेवेचे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे प्रतिपादन डॉ. उमेशकुमार बागल यांनी केले. लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या द्वितीय सत्रातील प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेस मुंबई विद्यापिठाचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. उमेशकुमार बागल यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पर्यावरण संवर्धन, समाजसेवा, व्यक्तिमत्त्व विकास, वेळेचे व्यवस्थापन यासारखी विविध कौशल्ये या विभागातून विकसित केली जातात. जाणीव, तर्कशक्ती, भावनिक बुद्धिमत्ता, सातत्य आदी व्यक्तिमत्त्व विकासाच्या पैलूंमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या विभागातून उत्तम सामाजिक कार्य करणारे जबाबदार नागरिक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये होते. या वेळी समन्वयक प्रा. हनुमंत सुतार, प्रा. शरीफ काझी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.