कोकण

खेड-जगबुडी नदीपात्रातील मार्ग बंद

CD

rat29p21.txt-
14198
खेड ः जगबुडी नदीपात्रातील बंद झालेला मार्ग.

जगबुडी नदीपात्रातील मार्ग बंद
गाळ उपसा कामाचा फटका : पाच किमीचा वळसा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २९ : शहरात बाजारहाट, शिक्षण, रोजगार व दैनंदिन कामांसाठी पिढ्यानपिढ्या वापरात असलेला जगबुडी नदीपात्रातील मार्ग गाळ उपसा कामामुळे पूर्णतः बंद झाल्याने भोस्तेसह तीन गावातील ग्रामस्थ, महिला व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या मार्गामुळे अवघ्या ३ किमीचे अंतर सहज गाठता येत होते; मात्र आता वळसा घालून जगबुडी पुलावरून प्रवास करत पाच किमीचे अंतर ओलांडताना वेळ व पैशांचा अपव्यय होत आहे.
भोस्ते येथील जलालशहा मोहल्ला, जसनाईक मोहल्ला, खेडेकरवाडी, बौद्धवाडी, रहाटेवाडी, पाटीलवाडी तसेच अलसुरे, निळीक व कोंडिवली गाववाड्यांतील ग्रामस्थ मटण-मच्छीमार्केटमार्गे नदीपात्रातूनच पायी ये-जा करत होते. पावसाळ्याचे चार महिने वगळता उर्वरित आठ महिने हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरत होता. ‘तारा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वाटेवर दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असायची; मात्र गेल्या काही दिवसांपासून जगबुडी नदीपात्रात दिवसरात्र गाळ उपसा सुरू असल्याने हा पिढ्यानपिढ्यांचा मार्ग नामशेष झाला आहे. परिणामी, ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांना व महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत असून, अनेकवेळा एसटी बस चुकल्यानंतर त्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे, ज्यामुळे आर्थिक भूर्दंडही सोसावा लागत आहे.
मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थांना वळसा घालून प्रवास करावा लागत असून, याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकावर आणि महिलांच्या दैनंदिन कामांवर होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील अवघ्या ३ किमी अंतराच्या या मार्गावर ‘फरशी’ घालून सुरक्षित पायवाट उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कोट
भोस्ते-अलसुरे सीमेजवळ गाळ उपसा केल्यास पुराचे पाणी वेगाने पुढे वाहून जाईल; मात्र प्रशासन दरवर्षी भोस्ते कलम ते मटण-मच्छीमार्केटलगतच गाळ उपसा करण्यावर अट्टाहास का करते0 ग्रामस्थांचा पिढ्यानपिढ्यांचा मार्ग बंद करून प्रशासन नेमके काय साध्य करू पाहत आहे.
- नथुराम खेडेकर, माजी उपसरपंच, भोस्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT