कोकण

लोटे एमआयडीसी होणार खड्डे मुक्त

CD

rat29p16.jpg
14161
लोटे परशुराम एमआयडीसीतील रस्तेदुरूस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे.
-------------

लोटे एमआयडीसी होणार खड्डेमुक्त
रस्त्यांची दुरूस्ती सुरू; २२०० मीटर रस्ते होणार सिमेंट काँक्रिटचे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ : लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख रस्त्यांची दुरूस्ती सुरू झाली आहे. महामंडळाने हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयडीसीमधील रस्ते लवकरच खड्डेमुक्त होणार आहेत. काँक्रिटीकरणामुळे या परिसरातील उद्योजक व वाहतूकदारांच्या गैरसोयी दूर होणार आहेत.
लोटे परशुराम ही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी आहे. सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या एमआयडीसीमध्ये साडेचारशेहून अधिक भूखंड आहेत. उद्योजक, कारखान्यामधील अधिकारी व कामगार तसेच परिसरातील ग्रामस्थ मिळून या भागात सुमारे २५ हजाराहून अधिक नागरिकांची एमआयडीसीमध्ये रेलचेल असते.
एमआयडीसीमधील रस्त्यावरून अवजड माल वाहतुकीची वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे एमआयडीसीमधील डांबरी रस्त्यांवर वारंवार खड्डे पडतात. एमआयडीसीने हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला तरी मुसळधार पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे खड्डे वाढत जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. खड्ड्यांमुळे उद्योजक आणि कारखान्यांमधील अधिकाऱ्यांच्या चारचाकी वाहनांचे वारंवार दुरूस्तीचे काम निघते. कामगारांच्या वाहतुकीसाठी असलेल्या बसचालकांनाही या खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत होता.
रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, ॲड. राज आंब्रे, सीईटीपीचे अध्यक्ष डॉ. सतीश वाघ तसेच लोटे परशुराम एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी या भागातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे व्हावेत, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यावरून लोटे परिसरातील काही गावांमध्ये जाता येते. त्या गावांमध्ये जाणाऱ्या एसटीच्या बसेससुद्धा एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यांवरून जातात. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे रस्तेदुरूस्तीची मागणी केली होती.
त्यामुळे माजी मंत्री रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून एमआयडीसीतील रस्तेदुरूस्तीसाठी निधी मंजूर करून घेतला. उद्योगमंत्री सामंत यांनी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी सुमारे १५ कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आणि प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली आहे. सध्या एक्सेल फाटा कडे येणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटचे काम सुरू आहे. एमआयडीसीतील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर उद्योजक, कामगार आणि स्थानिकांची गैरसोय आता दूर होणार आहे. लोटे येथे महामंडळाचे अग्निशमन केंद्र आहे. एमआयडीसीमध्ये किंवा चिपळूण आणि खेडमध्ये कुठेही आगीची घटना घडली. लोटे अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी तत्काळ जातात. त्यांनाही चांगल्या रस्त्यांमुळे आता अधिक गतीने घटनास्थळी पोचणे सहज शक्य होणार आहे.

कोट
rat29p15.jpg
14160
सतीश पोवार

एमआयडीसीमध्ये एकूण सुमारे १८ किमी लांबीचे रस्ते आहेत. पहिल्या टप्प्यात प्रमुख ५ रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. २ हजार २०० मीटर सिमेंट काँक्रिटचे होतील. उर्वरित रस्ते डांबराने दुरूस्त केले जातील.
- सतीश पोवार, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी रत्नागिरी
----------
कोट
rat29p14.jpg
14159
प्रशांत पटवर्धन

लोटे एमआयडीसीतील रस्तेदुरूस्तीचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे. आवश्यक त्या ठिकाणी पाईप टाकण्यात यावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटाराची व्यवस्था असावी. एमआयडीसीने ठेकेदाराकडून चांगल्या पद्धतीने काम करून घ्यावे. चांगल्या कामासाठी आमचे एमआयडीसी आणि ठेकेदाराला सहकार्य असेल.
- डॉ. प्रशांत पटवर्धन, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: पुण्यात निवडणुकीचा नवा पॅटर्न; 'हे' तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार

Video: धुरंधरच्या गाण्यावर पाकिस्तानी महिला पोलिसाचा तुफान डान्स; वर्दीवरचा व्हिडीओ व्हायरल

BMC Election: स्थगितीच्या सावलीत उमेदवारी! उघड नाराजी, तरी बॅकडोअर एन्ट्री! भाजपचा थरवळांसाठी खास डाव

BMC Election: 'आश्वासनं फसवी ठरली...'! डबेवाला संघटनेची उद्धव ठाकरेंवर नाराजी; महायुतीला पाठिंबा देत सत्ता बदलाचा इशारा

Latest Marathi News Live Update : ४२ लाखांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT