कोकण

मळेवाड येथे आगीमुळे काजू कलमे, गवत खाक

CD

14214

मळेवाड येथे आगीमुळे
काजू कलमे, गवत खाक
आरोंदा ः मळेवाड येथील पानाचे भोम धनगर सडा येथे रविवारी (ता. २८) दुपारी साडेबाराच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे येथील शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. यात काजू कलमे, गुरांसाठी ठेवलेले गवत जळून खाक झाले. दुपारच्या सत्रात आग लागल्याने ती विझविणे कठीण झाले होते. सावंतवाडी येथून अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब येईपर्यंत ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी आग आटोक्‍याचा अतोनात प्रयत्न सुरू केला; मात्र त्यांचे प्रयत्नांना यश आले नाही. पाण्याचा बंब येताच तत्काळ आग आटोक्‍याचा प्रयत्न सुरू झाला. सायंकाळी उशिरा आग आटोक्यात आली. मागील महिन्यातही अशाच प्रकारची आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
...................
14219

दिव्यांग विकास केंद्रात खाऊ वाटप
सावंतवाडी ः शहरातील समाज मंदिर येथील दिव्यांग प्रशिक्षण विकास केंद्र येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक विलास जाधव यांनी भेटवस्तू व खाऊचे वाटप केले. प्रशिक्षण केंद्राच्या शिक्षिका विदेशा सावंत व द्रौपदी राऊळ यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT