कोकण

देऊळवाडा-आडारीचा वीजपुरवठा विस्कळीत

CD

14232


देऊळवाडा-आडारीचा वीजपुरवठा विस्कळीत

नागरिक त्रस्त; ‘थ्री फेज’ कार्यान्वित करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २९ : शहरातील देऊळवाडा-आडारी रोड परिसरातील वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला असून वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या परिसरात तातडीने ‘थ्री फेज’ वीज लाईन कार्यान्वित करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी महावितरण कंपनीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
देऊळवाडा परिसरात विजेचा दाब वारंवार कमी-जास्त होत असतो. यामुळे घरातील तसेच दुकानांमधील महागडी विद्युत उपकरणे जळून खाक होत आहेत. अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे दैनंदिन कामकाजावरही याचा मोठा परिणाम होत आहे. या भागात वीज ग्राहकांची संख्या मोठी असतानाही सध्याचा वीजपुरवठा अपुरा पडत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या संदर्भात उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे यांना निवेदन दिले आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून महावितरणने तातडीने या भागाची पाहणी करावी आणि थ्री फेज लाईन बसवून दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी उमेश चव्हाण यांच्यासह मनोहर मालवणकर, संदीप मालवणकर, मयुरी देऊळकर, संतोष चव्हाण, विरेश किर, गणेश मुंबरकर, अरुण मुंबरकर, राजू किर, श्याम आजगावकर, विशाल आजगावकर, स्वप्निल मालवणकर, अमित बोर्डवेकर, भूषण मुंबरकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

आरोग्यासाठी खजूर ठरतोय 'नॅचरल सुपरफूड'! पण किती अन् कधी खावे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Odisha Elephant: ओडिशात १८ महिन्यांत ११४ हत्तींचा मृत्यू; सरकारची विधानसभेत माहिती, संरक्षणाचे प्रयत्न, काय आहेत कारणे?

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

SCROLL FOR NEXT