कोकण

मंडणगड-सोवेली कालभैरव मंदिरातील सामानाची चोरी

CD

सोवेली कालभैरव मंदिरात
पितळेच्या वस्तूंची चोरी
मंडणगड, ता. २९ ः तालुक्यातील सोवेली येथील श्री कालभैरव मंदिरातील पितळेच्या वस्तू आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोवेली गावठाण येथील अरविंद लक्ष्मण भोसले (वय ६१) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, २४ डिसेंबरला सायंकाळी ७ ते २५ डिसेंबर या कालावधीत सकाळी ६ या कालावधीत ही चोरी झाली. मंदिरास कुलूप नसल्याने चोरट्याने मुख्य दरवाज्याची कडी उघडून मंदिरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. चोरीत एकूण ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. त्यामध्ये ८ हजार रुपये किंमतीची सुमारे १५ किलो वजनाची पितळेची घंटा, ९ हजार ५०० रुपये किंमतीचा पितळेचा कलश, ९ हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर व हार्ड डिस्क तसेच ४ हजार रुपये किंमतीची ४ किलो वजनाची पितळेची घंटा यांचा समावेश आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांचा दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

Pune Latest News: पुण्यात अनधिकृत इमारतींवर हातोडा; वाघोलीत चार ते पाच मजल्यांच्या इमारती जमीनदोस्त

MLA Raju Navghane : सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला मान्यता! ४० गावातील ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

SCROLL FOR NEXT