कोकण

राजापूर -रोड रेल्वेस्थानकावर उभारणार लिफ्ट

CD

rat30p9.jpg-
14386
राजापूर ः राजापूर रोड स्थानकामध्ये असलेल्या खोलगट परिसरातून जा-ये करण्यासाठी पायऱ्यांचा वापर करताना प्रवाशी.

राजापूर रोड रेल्वेस्थानकावर उभारणार लिफ्ट
प्रवाशांची गैरसोय दूर; पंचक्रोशी ग्रामविकास समितीचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३०ः कोकण रेल्वेमार्गावर तालुक्यातील एकमेव असलेल्या राजापूर रोड रेल्वेस्थानक खोलगट भागात असल्यामुळे चढ-उतार करताना प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर लिफ्टची व्यवस्था करावी, अशी मागणी पंचक्रोशी ग्रामविकास समितीतर्फे कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्याला यश आले असून, कोकण रेल्वेने राजापूर रोड रेल्वेस्थानकात लिफ्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण रेल्वेमार्गावर राजापूर तालुक्यासाठी परिपूर्ण असे एकमेव राजापूर रोड रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी कोकणकन्या, तुतारी, मांडवी, नेत्रावती, दिवा सावंतवाडी या पॅसेंजर एक्स्प्रेससह उधना, मडगाव-नागपूर आणि काही हंगामी गाड्यांना थांबा आहे. त्यामुळे दररोज या स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हे स्थानक खोलगट भागात उभारलेले असल्यामुळे प्रवाशांना वर-खाली ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागते. सामानासह चढ-उतार करताना प्रवाशांना खूप अडचणी येतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी तसेच आजारी व्यक्तींना वर-खाली येताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी लिफ्ट उभारावी, अशी मागणी पंचक्रोशी ग्रामविकास समितीने पत्राद्वारे कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली होती. तसेच पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे माजी अध्यक्ष अनिल भोवड, नूतन अध्यक्ष विश्वास राघव, सचिव संदेश मिठारी, प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे, कार्याध्यक्ष संतोष जोगळे, खजिनदार अनिल राऊत व इतर पदाधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला होता. पंचक्रोशी ग्रामविकास समिती आणि त्यांचे सहकारी सातत्याने पाठपुरावा करत होते.

कोट
पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूर रोड स्थानकात लिफ्टसाठी सुमारे 60 लाखाची निविदा जाहीर केली आहे. लिफ्ट उभारल्यामुळे आता प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे होईल.
- आदिनाथ कपाळे, पंचक्रोशी ग्रामविकास समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT